Lucknow : आई-वडील मजुरीवर जायचे अन् शेजारी डाव साधायचा, मुलीवर बलात्कार, गर्भपात..
लखनऊमध्ये चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर (School Girl) तब्बल सहा महिने तिच्याच घरी बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपी उमर कुरेशी उर्फ गुड्डू चिमुकलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा.
ADVERTISEMENT
4th class school girl Rape and Abortion : देशभरात दररोज बलात्काराच्या (Raped Case) अनेक घटना घडत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका चौथीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर (School Girl) तब्बल सहा महिने तिच्याच घरी बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या बलात्कारामुळे मुलगी गर्भवती राहिली होती.तसेच आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने नर्सिंग होममध्ये नेऊन तिचा गर्भपात देखील करवला होता. मात्र मुलीची पोटदुखी आणि रक्त पाहून या घटनेचा उलगडा झाला होता. ही घटना कळताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली होती.(meat shopkeeper raped 4th class school girl and got abortion lucknow)
ADVERTISEMENT
घटनाक्रम काय?
अमेठी परीसरात राहणारी एक 8 वर्षाची मुलगी (School Girl) चौथीत शिकायची. या मुलीचे आई-वडील मजुरी करायचे. त्यामुळे ते दररोज मुलीला घरी एकटी सो़डून कामावर निघून जायचे. मुलीच्या याच घरी एकटे असण्याचा फायदा घेऊन शेजाऱ्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार (Raped Case) केला. घराच्या जवळच मटणाचे दुकान (meat shopkeeper) चालवणाऱ्या उमर कुरेशी उर्फ गुड्डू चिमुकलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. तसेच या घटनेची माहिती आई-वडिलांना दिल्यास मटण कापणाऱ्या चाकुने हत्या करेन अशी धमकी देखील तिला दिली होती. आरोपीने ही धमकी देऊन तब्बल 6 महिने तिचे लैंगिक शोषण केले होते.
हे ही वाचा : मोलकरीण.. हनीट्रॅप अन् डॉक्टर.. भयंकर घटनेचा कसा झाला पर्दाफाश?
मुलीचा गर्भपात देखील केला
आठ वर्षांच्या मुलीवर तब्बल सहा महिने सतत बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिली होती. दरम्यान आरोपी इतक्यावर थांबला नाही आपल्या गुन्ह्याची उकल होऊ नये यासाठी त्य़ाने मुलीला गर्भपात करायला लावला होता.यासाठी आरोपीने तिला एका नर्सिग होममध्ये नेले होते्. या नर्सिंग होममध्ये तिचा गर्भपात करण्यात आला होता.
हे वाचलं का?
दरम्यान मुलीची पोटदुखी आणि रक्त पाहून कुटुंबियांना संशय आला होता. मात्र भीतीपोटी ती काहीही सांगण्यास तयार नव्हती. पण मुलीला विश्वासात घेतल्यानंतर तिने शेजारचा दुकानदार गुड्डू उर्फ उमर कुऱेशीने लैंगिक शोषण केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर तत्काळ कुटुंबियांनी गोसाईगंज पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुड्डू उर्फ उमर कुऱेशीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. तसेच मुलीचे गर्भपात करणाऱ्या नर्सिंग होमवर आणि डॉक्टरांवर देखील कठोर कारवाई केली.
या घटनेची दखल उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी घेत संबंधिक नर्सिंग होमवर तक्रार दाखल करून कठोर कारवाईचे आदेश दिले. तसेच नर्सिंग होम सील करण्याचे म्हटले. अशा घृणास्पद गुन्ह्यांतील एकाही गुन्हेगाराला सोडले जाणार नाही. विभाग आणि शासन असे गुन्हे अजिबात खपवून घेणार नाही, असे देखील पाठक यांनी सांगितले. लखनऊमध्ये ही घटना घडली आहे.या घटनेने राज्य हादरलंय.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जावयाचा सासूवर बलात्कार, अश्लील फोटो काढले अन् म्हणाला…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT