Mira Road Murder : मनोज साने आणि सरस्वती वैद्यने केले होते लग्न?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

mira road murder story : The couple did not register their marriage but they got married as per the rituals in a temple.
mira road murder story : The couple did not register their marriage but they got married as per the rituals in a temple.
social share
google news

Mira Road Live In Partner Murder : मीरा रोड भागात घडलेल्या घटनेने महाराष्ट्रच नव्हे तर देशही हादरला. लिव्ह इन पार्टनरची मनोज साने याने हत्या केली आणि नंतर तुकडे करून शिजवले, ते कुत्र्यांना खाऊ घातले. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून, महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. यात त्यांनी लग्न केल्याबद्दलही महत्त्वाची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

सरस्वती वैद्य हिच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मनोज साने (56) याने तिच्याशी लग्न केले होते, परंतु दोघांनीही ही गोष्ट लपवून ठेवली होती. पोलिसांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मनोज साने याने पोलिसांना सांगितले की, सरस्वती वैद्य हिने विष प्राशन करून आत्महत्या केली. आपण केवळ शरीराचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा >> किचनमधली दृश्य पाहून पोलिसांचीही तंतरली, मीरा रोड हत्याकांडाची FIR जशीच्या तशी!

मुंबईच्या बाहेरील मीरा रोड (पूर्व) परिसरातून गुरुवारी अटक करण्यात आलेल्या मनोज सानेने चौकशीदरम्यान हेही सांगितले की, तो एचआयव्ही बाधित आहे आणि 36 वर्षीय वैद्य हिच्याशी त्याचे कधीही शारीरिक संबंध ठेवले नाही, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

दोघांनीही लग्नाची नोंदणी केली नाही

मयत सरस्वती वैद्यच्या तीन बहिणींच्या जबाबाचा दाखला देत मीरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी याप्रकरणात महत्त्वाची माहिती दिली. बजबळे म्हणाले, “या जोडप्याने त्यांच्या लग्नाची नोंदणी केली नाही, परंतु त्यांनी मंदिरात विधीनुसार लग्न केले होते.” त्यांनी पुढे सांगितले की, ” वैद्य यांनी त्यांच्या बहिणींना लग्नाबाबत सांगितले होते, मात्र त्या दोघांच्या वयात खूप अंतर असल्याने त्यांनी लग्नाची गोष्ट कुणालाही सांगितली नाही.”

हेही वाचा >> Mira Road: ‘मी वेब सीरिजमध्ये पाहिलं होतं…’ मनोज सानेच्या शेजाऱ्याचा हादरवून टाकणारा खुलासा

डीएनए चाचणी आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, मयत सरस्वती वैद्यचे पार्थिव बहिणींच्या इच्छेनुसार अंतिम संस्कारांसाठी सुपूर्द केले जाणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

ADVERTISEMENT

आईचे निधन, वडिलांनी दिले सोडून

डीसीपी बजबळे म्हणाले यांनी सरस्वती वैद्यची कौटुंबिक पार्श्वभूमीही सांगितली. ते म्हणाले, “सरस्वतीच्या आईचे सगळ्या बहिणी लहान असतानाच निधन झाले होते, तर तिच्या वडिलांनी त्यांना सोडून दिले होते. सरस्वतीने अहमदनगर जिल्ह्यातील एका आश्रम शाळेत (अनाथांसाठी शाळा) इयत्ता 10वीपर्यंत शिक्षण घेतले होते. वयाच्या 18 व्या वर्षी ती तिच्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी मुंबईला आली. सरस्वतीची आणि मनोजची भेट झाल्यावर त्याने तिला सेल्सगर्ल म्हणून नोकरी शोधून दिली.

ADVERTISEMENT

सरस्वतीच्या मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावल्यानंतर करणार होता आत्महत्या

मनोज सानेने पोलिसांकडे केलेल्या दाव्यानुसार सरस्वतीने आत्महत्या केली. तिच्या तोंडाला फेस येत होता आणि 3 जून रोजी सकाळी विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूसाठी आपल्याला जबाबदार धरलं जाईल, या भीतीने मनोजने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला होता.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने असा दावाही केला की मृतदेहाचे तुकडे नष्ट केल्यानंतर आत्महत्या करण्याचा विचार केला होता. पोलिसांचं असंही म्हणणं आहे की, आरोपी तपासकर्त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> Mira Road : ‘या’ माणसामुळे मनोज सानेने केलेल्या लिव्ह-इन पार्टनरच्या हत्याकांडाचं बिंग फुटलं

ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील नया नगर भागात एका फ्लॅटमध्ये बुधवारी पोलिसांना वैद्य यांच्या शरीराचे काही अवयव प्रेशर कुकरमध्ये शिजवलेले आणि काही भाजलेले आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती आणि साने भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. सानेला न्यायालयाने 16 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

सरस्वतीच्या तीन बहिणींचे नोंदवले जबाब

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “सरस्वतीच्या तीन बहिणींचे जबाब नोंदवले आहेत. या गुन्ह्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. सरस्वतीचा मृत्यू 4 जून रोजी झाल्याचा संशय आहे, मात्र फ्लॅटमधून येणारा दुर्गंध सहन न झाल्याने त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर 7 जून रोजी ही घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, साने गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांना खायला घालत होता, जे त्याने यापूर्वी कधीही केले नव्हते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT