Mira Road : तुकडे कुकरमध्ये शिजवणे, कुत्र्यांना टाकणे; हा राक्षसीपणा येतो कुठून?
श्रद्धा वॉलकर हत्याकांडाने बर्बरतेची परिसीमा ओलांडली. आफताबचे प्रकरण विस्मृतीत गेलेही नव्हते, तर मुंबईतील मीरा रोड हत्याकांडाने सगळ्यांची झोप उडवली.
ADVERTISEMENT
Mira Road News in Marathi : देशात आणि जगात दररोज हत्येच्या असंख्य घटना घडत आहेत. गोळ्या झाडणे, चाकूने किंवा कोणत्याही धारदार शस्त्राने हत्या करणे यासारख्या घटना तर इतक्या घडत आहे की, आता लोकही संवेदनाही झाल्यासारखं वाटतं आहे. पण, गेल्या काही काळात इतक्या क्रूर घडना घडल्या की, लोकांचा थरकाप उडाला. मग श्रद्धा वॉलकर हत्याकांडाने बर्बरतेची परिसीमा ओलांडली. आफताबचे प्रकरण विस्मृतीत गेलेही नव्हते, तर मुंबईतील मीरा रोड हत्याकांडाने सगळ्यांची झोप उडवली.
ADVERTISEMENT
या घटनेतही आरोपीने सात वर्षांपासून सोबत राहणाऱ्या लिव्ह इन पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. ते तुकडे शिजवून कुत्र्यांनाही खाऊ घातले. गुन्हे करणाऱ्या लोकांची व्याख्या मानसशास्त्रात वेगळी केली जाते. यामध्ये घरची परिस्थिती, बालपण, शिक्षण, सामाजिक स्थिती, मानसिक स्थिती या सर्व गोष्टी जबाबदार असतात. पण, जेव्हा अशी प्रकरणे समोर येतात, ज्यामध्ये आरोपी ओळखीच्या माणसाच्या मृतदेहासोबत राक्षसी कृत्ये करतात, मनोरुग्णांचा दर्जा दिला जातो.
हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ सर्व्हेमध्ये नेमकं काय?
प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. विधी एम. पिलनिया म्हणतात की, “मृतदेहासोबत क्रूर कृत्ये करण्याच्या मानसिकतेला वेडेपणा म्हणावं लागेल. नेक्रोफिनिक प्रवृत्ती असलेले गुन्हेगार मृतदेहाशी लैंगिक संबंध ठेवण्यासारख्या गोष्टीही करतात.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
“मृतदेहासोबत अशी कृत्ये करतात जी क्रौर्याच्या परिसीमा ओलांडणारी असतात. जसे की, मृतदेहाचा कोणताही भाग खाणे, त्याचे तुकडे करणे, ते उकळणे, कुत्र्यांना खाऊ घालणे, फ्रीजमध्ये ठेवणे, ही सर्व लक्षणे अँटी सोशल पर्सनालिटी डिसऑर्डरची मानली जातात. समाजात अशा क्रूर घटना वाढल्या आहेत. मीडिया किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ज्याप्रकारे अशा बातम्या अधिक दिसत आहेत, त्यावरून समाजात क्रौर्य वाढल्याचे दिसून येते.”
या घटनांना मानसिक आजारांशी जोडणे चुकीचे
IHBAS दिल्लीच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश म्हणतात की, “अशा घटनांना मानसिक आजारांशी जोडणे पूर्णपणे चुकीचे आहे. अशा लोकांना मनोरुग्ण म्हणणे किंवा त्यांना कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने ग्रासले आहे, असे सांगणे यातून संपूर्ण समाज आणि प्रसारमाध्यमांचा चुकीचा दृष्टीकोण दिसून येतो.”
ADVERTISEMENT
“माझ्या मते, हे प्रकरण मनोरुग्णाचे नसून अतिशय हुशार असलेल्या एका सामान्य व्यक्तीने केले आहे. पुरावे नष्ट करून स्वतःला वाचवण्यासाठी त्याने सर्व पुरावे नष्ट केले आहेत. बऱ्याच काळापासून लोकांमध्ये असा समज आहे की क्रूरतेच्या घटनांचा मानसिक आजाराशी संबंध आहे. पण, यामुळे मानसिक रुग्णांची काळजी घेण्यावर परिणाम होऊ शकतो. त्यांच्याबद्दल समाजात चुकीचा संदेश जातो. मानसिक रुग्णांबद्दल सहानुभूती किंवा सहानुभूती होण्याऐवजी, लोक त्यांच्याबद्दल भीती आणि द्वेष बाळगू लागतात.”
ADVERTISEMENT
हिंसाचार समाजाचा भाग
डॉ पिलानिया म्हणतात की, “सर्वसामान्य माणूसही हिंसक असतो. मनुष्य पशूतून माणूस बनलेला आहे. आदीम सभ्यतेकडून आधुनिक सभ्यतेकडे वाटचाल करत त्याने माणुसकी विकसित केली आहे. दया, करुणा, क्षमा आणि सहजीवन या संकल्पना स्वीकारल्या आहेत. मुलांचे संगोपन करताना, समाज म्हणून आपण त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करायला नको. अनेक मुलांमध्ये लहानपणापासूनच हिंसक वागणूक सामान्य मुलांपेक्षा जास्त असते.”
डॉ.विधी सांगतात की, “अनेक मुलं शांत स्वभावाची असली तरी ती कमी बोलतात, पण संधी मिळाल्यावर ते हिंसक वागतात. कधीकधी एखाद्या प्राण्याशी क्रूरता करणे, पाळीव प्राण्याला पाय धरून ओढणे किंवा एखाद्या लहान प्राण्याला मारणे, भावंडासोबत क्रूर व्यवहार करणे, शाळेत गुंडगिरी यासारख्या गोष्टी करतात. लहानपणात जेव्हा अशा मुलांकडे लक्ष दिलं जात नाही, अशी मुले मोठे झाल्यानंतर क्रूरपणे वागण्यापूर्वी कसलाही विचार करत नाहीत.”
मनोरुग्ण म्हणणे योग्य आहे का?
“केवळ एका घटनेच्या आधारे गुन्हेगाराला मनोरुग्ण म्हणणे योग्य नाही”, असे भोपाळचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ.सत्यकांत त्रिवेदी सांगतात. “त्यासाठी संबंधित गुन्हेगाराच्या मनाचा मानसशास्त्रीय अभ्यास व्हायला हवा. अशा घटनांमध्ये कोणत्याही कारणाला जबाबदार धरू नये. यामध्ये अनेक घटकांचा विचार करता येईल. उदाहरणार्थ, त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व कसे आहे. त्या व्यक्तीचे विरुद्धलिंगी व्यक्तीबद्दलचे विचार काय आहेत?, स्त्रियांबद्दल त्याला काय वाटते? समाजात स्त्रियांना कसे वागवले जाते, हे त्यांनी कसे बघितलेले असते?”
हेही वाचा >> Mira Road Murder : रेशन दुकानात भेट अन् क्रूर शेवट! झोप उडवणाऱ्या हत्येची Inside Story
“याशिवाय सदर व्यक्तीला अमली पदार्थांचे व्यसन, तर नाही ना हे बघायला हवे. नशेच्या उन्मादात तर असे घृणास्पद कृत्य घडले नाही ना. त्या व्यक्तीला डॅल्यूजनल डिसऑर्डर तर नाही ना ज्यात जोडीदाराबद्दलचा संशयातून द्वेष वाढत जातो. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सामाजिक शिक्षणाची कशी नक्कल करतात हेही पाहायला हवे. जसे आफताबचे प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये गाजले. काही वेळा अशा विषयांवर बनवलेल्या वेबसिरीज पाहूनही गुन्हेगार शिकतात.”
डॉ.सत्यकांत म्हणतात की, “मी नेहमी म्हणतो की, या घटनांचा जितका गवगवा होईल, तितक्या अशा घटना वाढतील. एक समाज म्हणून, हिंसा कशी सामान्य होत आहे हे समजून घेतले पाहिजे. वेब सीरिज महिलांवरील अत्याचाराही सहजपणे घेतले जात आहेत. भूतकाळात आपले आदर्श कोण होते आणि आता आमचे आदर्श कोण आहेत? आता गुन्हेगारीचा अवलंब करणे सोपे झाले आहे. यामध्ये एका प्रकारच्या मिश्र मॉडेलचा विचार करावा लागेल.”
हेही वाचा >> Mumbai :आर्थर रोड जेल हादरला! दोन कैद्यांकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार
“या घटनेकडे पाहता, असा गुन्हेगार व्यक्तिमत्त्व विकाराने ग्रस्त नक्कीच आहे. त्यामुळे त्याच्यातील दया, सहिष्णुता, प्रेम आणि करुणा संपली असावी. मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणणारा माणूस त्याच व्यक्तीचे तुकडे कसे करू शकतो? ते शिजवू कसे शकतो? हे सहज घेण्यासारखी गोष्ट नाही. अशा घटनांचा मनोवैज्ञानिक पद्धतीने अभ्यास व्हायला हवा, जेणेकरुन समाजातील एकंदरीत येणाऱ्या पिढीला अशा घटना म्हणजे चित्रपट किंवा वेबसिरीज नसून एक इशारा आहे हे शिकवता येईल.”
ADVERTISEMENT