Mumbai Crime : एनसीबी कार्यालयाच्या इमारतीतच तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह
मुंबईच्या फोर्ट परिसरात बॅलार्ड इस्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीत एका तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. हा तरूण चहाच्या टपरीवर हेल्पर म्हणून काम करायचा.
ADVERTISEMENT
Mumbai Crime News : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या फोर्ट येथील बॅलार्ड ईस्टेट (Ballard Estate) येथील नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) कार्यालयाच्या इमारतीत एका तरूणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे.25 ते 32 या दरम्यान तरूणाचे वय असण्याची शक्यता आहे. मृत तरूण याच इमारतीत काम करायचा, मात्र आता त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परीसरात खळबळ माजली आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. आता या प्रकरणात तरूणाचा मृत्यू झाला आहे की त्याची हत्या करण्यात आली आहे, याचा पोलीस तपास करत आहे. (mumbai crime suspicious worker dead body found in ballard estate building crime story)
ADVERTISEMENT
मुंबईच्या फोर्ट परिसरात बॅलार्ड इस्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीत एका तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. हा तरूण चहाच्या टपरीवर हेल्पर म्हणून काम करायचा. टपरीच्या आजूबाजूच्या इमारतीत जाऊन तो चहा विकायचा. याच तरूणाचा आता मृत्यू झाला आहे. तरूणाच्या मृतदेहाच्या शेजारी रक्त आढळले आहे. पण तरूणाच्या शरीरावर कोणतेही जखमेचे निशाण आहेत का? याची माहिती अद्याप मिळू शकली नाही आहे.
हे ही वाचा : Ramdas Kadam : ‘तुमचं पितळ उघड…’, कदमांचा घणाघात, कीर्तिकरांच्या फंडाबद्दल मोठा गौप्यस्फोट
दरम्यान बॅलार्ड इस्टेट इमारतीत पहिल्या माळ्यावर सरकारी लेखा आणि वित्त कार्यालय संस्थेचे ऑफिस आहे. तर दुसऱ्या माळ्यावर CG चे जनगणना कार्यालय आहे. आणि तिसऱ्या माळ्यावर नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे कार्यालय एनसीबीचे कार्यालय आहे. हे तीनही कार्यालय अतिमहत्वाचे कार्यालय आहेत. त्यामुळे या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
हे वाचलं का?
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती ही केंद्र सरकारच्या कार्यालयात जात होती आणि शेवटचं तरूणाला शुक्रवारी पाहिले गेले होते. तसेच तरूणाच्या मृतदेहाच्या शेजारी रक्त आढळले आहेत. पोलिसांनी सध्या हा मृतेदह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.
दरम्यान या घटनेत अद्याप तरूणाचे नाव कळू शकले नाही आहे. मृत तरूणाच्या शरीरावर कोणत्याही जखमेचे निशाण सापडल्याचीही कोणतीही माहिती नाही आहे. तसेच त्याचा मृत्यू झाला आहे की त्याची हत्या करण्यात आली आहे? हे देखील अद्याप स्पष्ट नाही आहे. मात्र या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : “चार हात असलेली लक्ष्मी कशी जन्म घेऊ शकते”, SP नेत्याच्या ट्विटने भडकला नवा वाद
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT