Exclusive: DHFL चे मालक Wadhawan बंधूंचा कैदेत राजेशाही थाट, गृह खात्याला हादरवणारा रिपोर्ट
Wadhawan Brothers Exclusive Report: हजारो कोटी रुपयांचा बँक घोटाळा करणारे DHFL चे मालक वाधवान बंधू हे कैदेत असतानाही राजेशाही थाट उपभोगत आहेत. मुंबई Tak ने केलेल्या Exclusive रिपोर्टनंतर राज्याच्या गृहखातं देखील हादरलं आहे.
ADVERTISEMENT
Wadhawan Brothers Mumbai Tak Exclusive Report: दीपेश त्रिपाठी, मुंबई: अलिशान कारमध्ये नाश्ता, फाइव्ह स्टार सुविधा… हे सगळं मिळतंय एका कैद्याला.. खरं तर या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही. हजारो कोटी रुपयांचा बँक घोटाळा करुन अलिशान आयुष्य जगणारी ही व्यक्ती आहे कपिल वाधवान. मेडिकल चेकअपच्या नावाने तळोजा जेलमधून मुंबईतील केईएम रुग्णालयात (KEM Hospital) येत कपिल वाधवान सर्व अलिशान सुखसोयी उपभोगत आहे. केवळ कपिल वाधवानच नाही तर धीरज वाधवान देखील याच पद्धतीने जेजे रुग्णालयाच्या पार्किंग लॉटमध्ये सर्व सुखसोयी उपभोगत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींवर लक्ष ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या पोलिसांसमोरच (Police) हा सर्व प्रकार सुरु आहे. (mumbai tak exclusive report in captivity lavish lifestyle of dhfl promoters kapil and dheeraj wadhawan marathi news in today)
ADVERTISEMENT
डीएचएफएल या फायनान्स कंपनीचे माजी प्रमुख कपिल आणि धीरज वाधवान हे बँक घोटळ्यांच्या आरोपाखाली तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. असं असताना देखील वाधवान बंधू सर्व अलिशान सुखसोयींचा आनंद घेत आहेत.
मुंबई Tak चा Exclusive रिपोर्ट
तारीख 7 ऑगस्ट, वेळ दुपारी 12 वाजता:
केईएम हॉस्पिटलच्या पार्किंग लॉटमध्ये प्रायव्हेट कार उभ्या होत्या. नातेवाईक आणि कर्मचारी कपिल वाधवान यांची वाट पाहत होते. कपिल वाधवान पांढऱ्या रंगाच्या अलिशान कारमध्ये बसले. कारमध्येच त्यांना जेवण, नाश्ता, कॉफी दिली गेली. याच कारमध्ये ते घरच्यांसोबत निवांत गप्पा मारत असल्याचं दिसून आलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Santosh Bangar : आमदार बांगर आले जोशात अन्.. थेट पोलिसातच गुन्हा दाखल !
इतकंच नाही तर फोन आणि लॅपटॉप देखील त्यांना वापरण्यासाठी दिला गेला. वाधवान यांच्यासोबत आलेल्या पोलिसांना देखील नाश्ता ऑफर केला गेला. याच कारमध्ये बसून वाधवान ऑफिसची कामं देखील करत होते. दुपारी १२ ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कपिल वाधवान हे याच कारमध्ये बसून त्यांच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी घेत होते.
ADVERTISEMENT
तारीख 9 ऑगस्ट, वेळ सकाळी 11.40 वाजता
जेजे हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये गाड्यांची ये-जा सुरु आहे. काही गाड्यांची सातत्याने जागा बदलली जाते. काही वेळात एका अलिशान कार पार्किंगमध्ये येते. थोड्या वेळातच एका पांढऱ्या इनोव्हा कारमधून धीरज वाधवान बाहेर येतात. बाहेर येत आपल्या कुटुंबीयांची ते भेट घेतात. कैदी नाही तर एका सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे धीरज वाधवान हॉस्पिटलच्या आवारात फिरताना दिसतात. कपिल वाधवान यांच्याप्रमाणेच अलिशान ट्रिटमेंट धीरज वाधवान यांना देखील दिली जात आहे. सकाळी 11.40 वाजेपासून ते रात्री पावणे नऊ वाजेपर्यंत धीरज वाधवान जेजे हॉस्पिटलच्या आवारात मोकळे फिरत असतात.
ADVERTISEMENT
वाधवान बंधूंवर नेमके काय आरोप?
कपिल आणि धीरज वाधवान यांच्यावर 17 बँकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. 34 हजार 614 कोटींचा घोटाळा केल्याचा वाधवान बंधूंवर आरोप आहे. हा भारतातील सर्वात मोठा बँक घोटाळा आहे. खासगी बँकेचा घोटाळा केल्याच्या आरोपावरुन एप्रिल 2020 साली सीबीआयने वाधवान बंधूंना अटक केली होती. वाधवान बंधूंवर अनेक सीबीआय आणि पोलीस केसेस आहेत. त्याचबरोबर ईडीने देखील या दोन्ही भावांवर केसेस दाखल केल्या आहेत.
कोरोनाच्या काळात भारतात कडक लॉकडाऊन असताना याच वाधवान कुटुंबाने मुंबई ते महाबळेश्वर असा प्रवास अलिशान कारमध्ये केला होता. त्यावेळी गृहखात्याचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी वाधवान कुटुंबाला प्रवास करण्यासाठीचं पत्र दिलं होतं. आता हेच अमिताभ गुप्ता महाराष्ट्र कारागृह विभागाचे अतिरिक्त महासंचालक आहेत.
अनेक कैदी वैद्यकीय सुविधेअभावी करागृहात पडून असताना वाधवान बंधू मात्र कारागृहाच्या बाहेर अलिशान दिवस घालवत असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई Tak च्या Exclusive रिपोर्टनंतर फडणवीस म्हणाले, कोणालाही…
दरम्यान, मुंबई Tak च्या या Exclusive रिपोर्टनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले केलं की, ‘या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. यामध्ये जे कोणी दोषी आढळलतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.’
हे ही वाचा>> Ranjit Naik-Nimbalkar: वहिनी-दादाची आत्महत्या, भावाने बोट छाटलं.. BJP खासदाराला अटक होणार?
दुसरीकडे, डीसीपी संजय पाटील यांनी मुंबई Tak शी संवाद साधताना सांगितले की, ‘वाधवान बंधूंना रुग्णालयात घेऊन जाणारे कर्मचारी हे नवी मुंबई पोलीस विभागाचे कर्मचारी आहेत आणि आम्ही ही बातमी पाहिली आहे. प्रथमदर्शनी जे दिसतंय ते योग्य आहे. त्यामुळे सर्वांवर कारवाई केली जाईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत. आरोपींना घेऊन जाणाऱ्या वाहनांना जीपीएस बसविण्यात आले आहे, यासोबतच प्रत्येक वाहनात सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत. ज्या तारखांना त्यांना रुग्णालयात नेण्यात आले त्या सर्वांची तपासणी केली जाईल.’ असं पाटील यावेळी म्हणाले.
वाधवान बंधूंविरोधात हे गुन्हे
34,615 कोटी युनियन बँक घोटाळा (CBI), येस बँक लाचखोरी प्रकरण (CBI), यूपी पॉवर कॉर्पोरेशन घोटाळा (CBI), 14 कोटी PMAY घोटाळा (CBI), इक्बाल मिर्ची मनी लाँडरिंग प्रकरण (ED), यूपी पॉवर कॉर्पोरेशन घोटाळा (ED), येस बँक मनी लाँडरिंग (ED), 34,615 कोटी युनियन बँक घोटाळा (ED), लॉकडाऊन उल्लंघन (Satara Police)
ADVERTISEMENT