गुजरात दंगल: माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह 68 आरोपींची निर्दोष सुटका

मुंबई तक

ADVERTISEMENT

2002 Gujarat Riots Naroda case all 86 accused acquitted
2002 Gujarat Riots Naroda case all 86 accused acquitted
social share
google news

Naroda riot case all 86 accused acquitted : गुजरात दंगलीतली नरोडा हत्याकांडात (Naroda riot case) अहमदाबादमधील स्पेशल कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. कोर्टाने भाजपच्या माजी मंत्री माया कोडनानी आणि बाबू बजरंगीसह (Maya Kodnani) 68 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात 86 आरोपी होते, यामधील 18 आरोपींचा मृत्यु झाला होता. एसआयटी प्रकरणांसाठीचे विशेष न्यायाधीश एसके बक्षी यांनी हा निकाल दिला आहे. (naroda riot case all 86 accused and former gujrat minister maya kodnani acquitted)

ADVERTISEMENT

प्रकरण काय?

2002 साली गोधरामध्ये चालत्या ट्रेनला आग लावण्यात आली होती. या प्रकरणात 58 निष्पाप नागरीकांचा मृत्यू झाला होता. या गोधरा कांड (Godhra kand) घटनेचा निषेध करण्यासाठी दुसऱ्याच दिवशी बंद पुकारण्यात आला होता. या दरम्यान अहमदाबादच्या नरोडा गावात (Naroda riot case) जातीय हिंसाचार पसरला होता.या हिंसाचारात 11 जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगली झाल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठित करण्यात आली होती. एसआयटीने या प्रकरणात माया कोडनानी यांना मुख्य आरोपी केले होते.माया कोडनानी राज्य सरकारमध्ये माजी मंत्री राहिल्या आहेत.

हे ही वाचा >> हत्येच्या काही सेंकद आधी अतिक अहमदने कोणाला केला होता इशारा? Video व्हायरल

नरोडा गाव हत्याकांड प्रकरणातील आरोपींवर आयपीसी कलम 302 खुन, 307 हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी,143, 147 दंगल, 148, 129 बी, 153 के अंतर्गत केस दाखल करण्यात आली होती. यापुर्वी माया कोडनानी यांना नरोडा पाटिया दंग प्रकरणी विशेष न्यायालयाने 28 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अमित शाह होते साक्षिदार

दरम्यान या प्रकरणाची सुनावणी 2009 ला सुरु झाली होती. या प्रकरणात 187 नागरीकांची चौकशी करण्यात आली होती, तर 57 प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवण्यात आले होते. या प्रकरणाची 13 वर्ष सुनावणी सुरु होती. 2017 साली माया कोडनानी यांच्या बचावासाठी अमित शाह साक्षिदार म्हणून हजर झाले. माया कोडनानी दंगलीच्या वेळी मोदी सरकारमध्ये मंत्री होत्या.

हे ही वाचा >> अभ्यासक्रम कोणताही असला तरी परीक्षा द्या मराठीमध्येच! UGC चे विद्यापीठांना महत्वाचे निर्देश

शाह कोर्टात काय म्हणाले?

28 फेब्रुवारीच्या सकाळी 7.15 वाजता विधानसभेसाठी निघालो होतो. सभागृहाचे कामकाज सकाळी 8.30 वाजता सुरु होणार होते. यावेळी 28 फेब्रुवारीच्या सकाळी 8.40 वाजता माया कोडनानीला गुजरात विधानसभामध्ये पाहिले होते, असे अमित शाह यांनी कोर्टात सांगितले होते. विधानसभा सोडून सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापुर्वी त्या कुठे होत्या ते मला माहित नाही. यानंतर सकाळी 11 ते 11.30 दरम्यान त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाहिले गेले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT