Navi Mumbai Crime : दारू पार्टी भोवली, तरुणीचा जीवच गेला… अपघात की घातपात?
नवी मुंबईतून दारू पार्टी (liquor party) करताना एका तरूणीचा बिल्डींगच्या 7 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.
ADVERTISEMENT
देशातील तरूणाई बिनधास्तपणे पार्ट्या करत असते. मात्र कधी कधी अशा पार्ट्या करणे जीवावर बेतत असते. अशीच एक घटना आता नवी मुंबईतून (Navi Mumbai) समोर आली आहे. या घटनेत दारू पार्टी (liquor party) करताना एका तरूणीचा बिल्डींगच्या 7 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच हा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण काय समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी दोन मित्रांना ताब्यात घेतले आहे. या तरूणांची देखील चौकशी करण्यात येत आहे. (navi mumbai 19 year old girl falls to death during liquor party with 2 freinds)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील (Navi Mumbai)एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर मुलगी तिच्या मित्रांसोबत दारू पार्टी करत होती. ही पार्टी सुरु असताना तरूणी 7 व्या मजल्यावरून खाली कोसळल्याची घटना घडली होती. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. बेलापूर परीसरातील एनआरआई पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी नवी मुंबईतील एका इमारतीत तरूणी आणि तिच्या मित्रांसोबत दारूपार्टी सुरु होती. ही पार्टी सुरु असताना अचानक सातव्या मजल्यावरून तरूणी खाली कोसळली होती. या अपघातात तिच्या जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती.
हे ही वाचा : आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, रागाच्या भरात दगडाने ठेचून हत्या
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सूरू केला होता. पोलिसांनी तरूणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवला आहे. तसेच तरूणीच्या दोन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. दरम्यान तरूणीचा 7 व्या मजल्यावरून पडून अचानक मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र पोलिसांनी सांगितले आहे की, तरूणींच्या मित्रांची चौकशी केली जात आहे. तसेच तिचा मृतदेह देखील पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आता मित्रांची चौकशी आणि पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : किचनमधली दृश्य पाहून पोलिसांचीही तंतरली, मीरा रोड हत्याकांडाची FIR जशीच्या तशी!
ADVERTISEMENT