Crime : “मला तुझ्याशी लग्न करायचं आहे” : मुलाने केलं प्रपोज; नकार देताच भररस्त्यात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Girl refused to marry young man attacked with a knife and ran away from the spot
Girl refused to marry young man attacked with a knife and ran away from the spot
social share
google news

Mumbai Crime News : मुंबई : डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. युवतीने लग्नासाठी नकार देताच मित्राने भररस्त्यात युवतीच्या गळ्यावर चाकूने वार करत घटनास्थळावरुन फरार झाल्याची घटना घडली आहे. जिग्नेश असं यातील आरोपीचं नाव असून टिळकनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर गंभीर जखमी तरुणीवर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार तिची तब्येत स्थिर आहे. (Girl refused to marry young man attacked with a knife and ran away from the spot.)

ADVERTISEMENT

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिग्नेश डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा परिसरात वास्तव्यास आहे. त्याचा मित्रही त्याच परिसरात राहतो. तर या प्रकरणातील पीडित मुलगी जिग्नेशला आपला मित्र मानत होती, तर जिग्नेश तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता.

खळबळजनक… पुण्यात प्रेयसीच्या बाळाची उकळत्या पाण्यात बुडवून हत्या, कारण…

वाटेत थांबवून केलं प्रपोज :

14 एप्रिल रोजी रात्री उशीरा पीडित मुलगी एकटीच घरी जात होती. ती डोंबिवली पूर्वेतील शांतीनगर भागातील वेद ओमशांती सोसायटीसमोरील रस्त्यावर आली असता अचानक तिच्या समोर जिग्नेश आला. त्याने तिला वाटेत अडवून लग्नासाठी प्रपोज केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझ्याबरोबर चल’ :

जिग्नेश संबंधित मुलीला म्हणाला, “मला तू खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करायचं आहे, तू माझ्याबरोबर चल”. हे ऐकून मुलीच्या पायाखालची जमीन सरकली. कारण ती जिग्नेशला केवळ आपला मित्र मानत होती. जिग्नेश असं कधी करेल असा विचारही तिने कधी केला नव्हता. याच कारणामुळे तिने लग्नाचा प्रस्ताव नाकारला.

Crime: प्रयागराज पुन्हा हादरलं! हॉटेलमध्ये आढळला डेप्युटी CMO चा मृतदेह…

पण याचा राग मनात ठेवून जिग्नेशने तिच्या गळ्यावर चाकूने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच टिळक नगर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमी मुलीला डोंबिवली येथील रुग्णालयात दाखल केले. इथल्या डॉक्टरांनी पिडीत मुलीची प्रकृती गंभीर असल्याचं सांगत उपचारासाठी अन्य रुग्णालयात पाठविण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT