Palghar: बॉयफ्रेंडला झाडाला बांधलं अन् गर्लफ्रेंडवर केला गँगरेप
girl gang raped by two man in palghar : पालघरमध्ये बॉयफ्रेंडसोबत फिरत असलेल्या मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. आरोपींनी बॉयफ्रेंडला झाडाला बांधून जंगलात नेऊन संतापजनक कृत्ये केलं.
ADVERTISEMENT
Palghar Crime News : बॉयफ्रेंडसोबत संध्याकाळी फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. पालघरजवळील जंगलात बुधवारी (22 मार्च) सायंकाळी ही घटना घडली. दोन आरोपींनी तरुणीला जंगलात नेऊन अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ADVERTISEMENT
पालघरमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणी तिच्या बॉयफ्रेंडसोबत जवळच्या टेकडीकडे सायंकाळी फिरायला गेले होते. तिथे 22 आणि 25 वर्षांच्या आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
बॉयफ्रेंडला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार, काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरुणी बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली होती. टेकडीवर फिरायला जात असताना त्यांना आरोपींनी बघितलं. त्यानंतर आरोपींनी त्या हटकलं. पीडित तरुणीचा बॉयफ्रेंड आणि आरोपींमध्ये वाद झाला.
आरोपींनी बिअरच्या बाटलीने केली मारहाण
वाद झाल्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीच्या बॉयफ्रेंडला बिअरच्या बाटल्यांनी मारहाण केली. आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी बॉयफ्रेंडचे कपडे काढले आणि त्याला झाडाला बांधलं.
आरोपी तरुणीला जंगलात घेऊन गेले आणि…
बॉयफ्रेंडला झाडाला बांधल्यानंतर आरोपींनी तरुणीला पकडलं. त्यानंतर ते तरुणीला जंगलात घेऊन गेले आणि आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तरुणीची पर्सही जाळून टाकली. पीडित तरुणीने कशीबशी आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका केली आणि घरी पोहोचली.
ADVERTISEMENT
हेही वाचा – WhatsApp वर एक मेसेज अन् मुलगी दारात हजर… ठाण्यात सेक्स रॅकेट…
पीडित तरुणीने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. झालेला प्रकार कळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन झाडाला बांधलेल्या तरुणाला सोडलं.
ADVERTISEMENT
हेही वाचा – प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडलं; मग दोघांनी पतीसोबत केलं असं काही की…
या प्रकरणी पोलिसांनी विरारमधील साईनाथ नगर भागात राहणाऱ्या या आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी 22 वर्ष आणि 25 वर्ष वय असलेल्या दोन्ही आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT