Pune Crime: हत्या की आत्महत्या? मायलेकीचे मृतदेह आढळले धक्कादायक अवस्थेत!
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे 30 वर्षीय महिला आणि तिच्या 4 वर्षांच्या मुलीचे मृतदेह धक्कादायक अवस्थेत आढळले.
ADVERTISEMENT
Pune Indapur Crime News : पुणे (Pune) जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातील हगारेवाडी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे 30 वर्षीय महिला आणि तिच्या 4 वर्षांच्या मुलीचे मृतदेह धक्कादायक अवस्थेत आढळले. या घटनेमुळे हगारेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Indapur Hagarewadi Crime News bodies of mother and daughter were found hanged)
ADVERTISEMENT
अश्विनी सागर म्हस्के (वय 30 वर्षे) आणि सानवी सागर म्हस्के (वय 4 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. घराच्या एका कोपऱ्याला दोरीच्या सहाय्याने लटकलेल्या अवस्थेत मायलेकींचे मृतदेह आढळल्याने ही आत्महत्या की हत्या याचा तपास वालचंदनगर पोलीस करत आहेत.
वाचा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, उद्धव ठाकरेंच्या भेटीला! कारण…
मायलेकीची हत्या की आत्महत्या? पती ताब्यात!
यादरम्यान, वालचंदनगर पोलीस मृत महिलेच्या पतीला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेत असताना संतप्त कुटुंबीयांनी सागर म्हस्के याला बेदम मारहाण केली. या घटनेने हगारेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला आहे.
वाचा : Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियांनी जोडीदारांसोबतचे नाते तोडले, कारण…
सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा, असा आला संपूर्ण प्रकार उघडकीस…
मिळालेल्या माहितीनुसार, तेजश्री शेखर म्हस्के आणि मृत अश्विनी म्हस्के या सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहेत. तेजश्री दुपारी शेतातून घरी आल्या. त्यावेळी घराची खिडकी उघडी दिसली. तेजश्री यांनी खिडकीतून पाहिले असता अश्विनी आणि सानवी यांचा मृतदेह घरातील पत्र्यच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकल्याचे आढळला.
वाचा : Sharad Pawar नी PM मोदींचे मानले आभार! गडकरी, गोयल, फडणवीसांचे टोचले कान
मृत महिलेच्या भावाने केला गुन्हा दाखल
या घटनेची माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. तसंच मृत अश्विनीचे भाऊ तात्या आण्णा भोंग (रा. निमगाव केतकी, इंदापूर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता ही आत्महत्या आहे की हत्या याचा तपास पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT