मावस बहिणीला ज्यूसमधून दिलं गुंगीचं औषध, बलात्कार केला अन्…; वाचा Inside Story
मोहालीमध्ये परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरूणीच्या मावशीच्या मुलावरच हा बलात्काराचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
Punjab Mohali News : पंजाबमधील (Punjab) मोहालीत (Mohali) परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरूणीच्या मावशीच्या मुलावरच हा बलात्काराचा (Rape Case) आरोप आहे. तरूणीने सांगितले की, तिच्या मावशीच्या मुलाने ज्यूसमध्ये अमली पदार्थ (Drugs) मिसळले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. पीडिता शुद्धीवर येताच तिचा व्हिडीओ बनवला गेला असल्याचं तिला समजलं. (Punjab Mohali News Giving drugs from juice to the young woman and Aunt’s son raped her)
ADVERTISEMENT
त्यानंतर आरोपी तिला ब्लॅकमेल करू लागला. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी बीसीएफच्या तयारीसाठी मावशीच्या घरी राहायला आली होती. हे संपूर्ण प्रकरण मोहाली, चंदीगडचे (Chandigarh) आहे. ज्यादिवशी हा प्रकार घडला तेव्हा, पीडिता कोचिंगवरून घरी परतली तेव्हा तिचे काका-मावशी घरी नव्हते. घरी फक्त मावशीचा मुलगा होता. त्यानंतर मावशीच्या मुलाने ज्यूसमध्ये गुंगीचं औषध मिसळलं आणि तिच्यावर बलात्कार केला. ती शुद्धीवर येईपर्यंत आरोपीने तिचा व्हिडीओ बनवला आणि नंतर तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
वाचा: Mohan Bhagwat : ‘कॉलनीमध्ये घर नाकारलं जातं’, सरसंघचालक काय बोलले?
पीडित तरूणी BSF ची करत होती तयारी!
पीडित तरूणीने दिलेल्या माहितीनुसार, ती 2021 मध्ये बीएसएफची तयारी करत होती तेव्हा तिच्या मावशीने सांगितले की त्यांच्या घराजवळ एक कोचिंग सेंटर आहे जे बीएसएफची तयारी करणाऱ्यांना प्रशिक्षण देते. त्यानंतर ती मावशीच्या घरी राहायला गेली आणि तिथेच राहून तयारी करू लागली. एकदिवशी घरी कोणी नसताना मावशीच्या मुलाने ज्यूसमध्ये अमली पदार्थ मिसळला आणि ती बेशुद्ध पडताच तिच्यावर बलात्कार केला.
वाचा: “भाजप मला तुरुंगात टाकायला निघालं होतं”, हसन मुश्रीफांच्या विधानाने ‘खळबळ’
जबरदस्तीने संबंध ठेवण्याची दिली धमकी
पीडित तरूणीने दिलेल्या माहितीनुसार, ‘जेव्हा तिने आपल्या काकांना हा सर्व प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला काही सांगण्याऐवजी त्याला समजावून सांगितले आणि घरी पाठवले. काही दिवसांनी पीडिता तिच्या घरी जाऊन सलूनमध्ये काम करू लागली, तेव्हा तिच्या मावशीचा मुलगाही तिथे आला आणि सर्वाना व्हिडीओ दाखवण्याची धमकी देऊ लागला. तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
वाचा: “सोन्याचे खोके, नवी फडणविशी” , ठाकरेंचे मोदी-शांहावर ‘बाण’, काय म्हटलंय?
यानंतर पीडिते तिचं लग्न करून द्या असं घरच्यांना सांगितलं. पण याची माहिती मावशीच्या मुलाला कळली. लग्न थांबवण्यासाठी त्याने हा व्हिडीओ तिच्या दोन महिला मैत्रिणींना पाठवला. यानंतर त्याने पीडितेला त्याच्यासोबत मोहालीला चलण्यास सांगितले. तिने नकार दिल्यावर तो व्हिडीओ सर्वांना पाठवण्याची धमकी दिली. यानंतर ती घरच्यांना न सांगता मोहालीत राहू लागली. तिथे तो बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा आणि तिने नकार दिल्यावर तिला मारहाणही करायची. अखेर पीडितेने या छळाला कंटाळून एसएसपी कार्यालयात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT