अतीक अहमदच्या नावाने भाजपचा आमदार मागतोय मतं, म्हणतोय बघा…

मुंबई तक

ADVERTISEMENT

BJP itself has claimed that the killing of Atiq Ahmed and Ashraf is a big success of BJP
BJP itself has claimed that the killing of Atiq Ahmed and Ashraf is a big success of BJP
social share
google news

उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येबाबत सर्वच विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. एकीकडे अतिक अहमदचा मुलगा असद याच्या एन्काऊंटरचे प्रकरण चर्चेत असतानाच अतिक आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची हत्या करण्यात आली. पोलिस संरक्षणात झालेल्या हत्येमुळे केंद्रातील आणि उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका होत आहे. या हत्येवरुन उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव ते हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासह सर्वच नेत्यांनी भाजपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. (BJP itself has claimed that the killing of Atiq Ahmed and Ashraf is a big success of BJP)

ADVERTISEMENT

अशात या हत्येबाबत भाजप अद्याप मौन बाळगून होता, मात्र आता महापालिका निवडणुकीच्या प्रचारात या हत्या म्हणजे भाजपचं मोठं यश असल्याचा दावा खुद्द भाजपनेच केला आहे. सहारनपूरचे भाजप आमदार राजीव गुंबर यांनी अतिक आणि अशरफ यांच्या हत्येला भाजपचे यश म्हटलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमात बोलताना राजीव गुंबर म्हणाले की, माफियांवर बुलडोझर चालवला की नाही…? अतीकला वर पाठवलं की नाही…? अशरफला वर पाठवलं की नाही…? त्यामुळे सहारनपूरमधूनही गुंडांना बाहेर काढायचं असेल तर डॉ. अजय सिंग यांना निवडून द्यायचं आहे.

Atiq Shooter Interrogation : ‘मी कट्टर हिंदूवादी आणि परशुरामाचा वंशज’, चौकशीत आरोपी लवलेशचा खुलासा

सहारनपूर येथे बुधवारी (१९ एप्रिल) भाजपच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राजीव गुंबर बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील विकासकामांसोबतच या हत्यांना एकप्रकारे राज्यातील योगी सरकार यश म्हटलं. राजीव गुंबर यांचे अतिक आणि अशरफ हत्याकांड प्रकरणी वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अतीक-अशरफ हत्येच्या 3 तासापूर्वी काय घडलेलं?, अंगावरा काटा आणणारी कहाणी

दुसरीकडे, यूपी सरकारचे मंत्री कुंवर ब्रिजेश सिंह म्हणाले, ‘जे अतिक-अश्रफ यांच्या हत्येची सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत, माझी विनंती आहे की, चौकशीची मागणी करणाऱ्यांची आधी सीबीआय चौकशी झाली पाहिजे… ते माफिया होते आणि त्यांना कोणी हिरो बनवलं याची चौकशी झाली पाहिजे. मंत्री कुंवर ब्रिजेश सिंह म्हणाले, ‘आम्ही कोणत्याही प्रकारच्या तपासाला घाबरत नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी या घटनेची तातडीने दखल घेत न्यायालयीन आयोगाची स्थापना केली. त्याचा सविस्तर अहवाल आल्यानंतर त्यावर व्यापक चर्चा होईल, त्याच्या आधारे कारवाई केली जाईल.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT