Crime News : बायकोची साडी चोरली, त्याने शेजाऱ्याला गोळ्याच घातल्या
क्षुल्लक कारणावरून हत्या करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका सिक्युरीटी गार्डने दुसऱ्या सिक्युरीटी गार्डची हत्या केल्याची घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
क्षुल्लक कारणावरून हत्या करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका सिक्युरीटी गार्डने दुसऱ्या सिक्युरीटी गार्डची हत्या केल्याची घटना घडली आहे. पिंटू कुमार (30) असे हत्या करण्यात आलेल्या सिक्युरीटी गार्डचे नाव आहे. पिंटू कुमारवर आरोपी सिक्युरीटी गार्डच्या पत्नीने साडी चोरल्याचा आरोप केला होता. या आरोपावरून आरोपीचा पिंटू सोबत वाद झाला. या वादातून आरोपीने संतापून गोळी झाडून पिंटूची हत्या केली आहे. हरियाणाच्या गुरूग्राममध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने परीसरात खळबळ माजली आहे. (saree stolen security guard killed his neighbour gurugram haryana crime story)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचा बिहारचा असलेला पिंटू कूमार (30) गुरुग्रामच्या नाथुपूरा गावात राहतो. ज्या इमारतीत पिंटू कूमार राहत होता, त्याच इमारतीत अजय कुमार (42) आपल्या पत्नीसोबत राहतो. पिंटू कुमार आणि अजय कुमार हे दोघेही एकमेकांच्या शेजारी शेजारी होते. आणि दोघेही सिक्युरीटी गार्डचे काम करतात. आरोपीची साडी चोरल्यावरून वाद होत झाला होता. या वादातून पिंटू कूमारची हत्या झाल्याची घटना घडली.
हे ही वाचा : Kalyan Crime: आईसमोरच सपासप वार…! तरुणीने रक्ताच्या थारोळ्यात सोडला जीव
नेमका घटनाक्रम काय?
15 ऑगस्टला अजय कुमार रात्री 8 वाजताच्या सुमारास कामावरून घरी परतला होता. नवरा घरी परतल्यानंतर बायको रिनाने अजयकडे शेजारच्या पिंटूने साडी चोरल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीचा जाब विचारण्यासाठी अजय कुमार पिंटूच्या घराजवळ गेला. यावेळी अजयने बायकोची साडी चोरल्याचा जाब विचारला असता पिंटूने या घटनेला नकार दिला. पिंटूने वारंवार नकार दिल्यानंतर दोघांमध्ये शाब्दीक वाद वाढला. याच वादातून संतप्त होत अजय कुमारने घरात जाऊन लायसेन्सवाली बंदूक आणून पिंटू कुमारवर गोळी झाडली. या घटनेनंतर स्थानिकांनी पिंटू कुमारला नजीकच्या रूग्णालयात दाखल केले होते.मात्र डॉक्टरांनी पिंटू कुमारला मृत घोषित केले आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पिंटूला वाचवण्याचा प्रयत्न झाला, पण….
घटनास्थळी पिंटू कुमार सोबत उपस्थित असलेला त्याचा रूममेट अशोक कुमार म्हणाला की, ज्यावेळेस अजय कुमार घरातून बंदूक आणायला गेला, त्यावेळेस मी त्याला रोखण्याचा खूप प्रयत्न केला. अजयच्या हातून बंदूक देखील हिसकावली. पण अजयने पुन्हा माझ्या हातून बंदूक हिसकावत पिटूंवर गोळी झाडून त्याची हत्या केली.
दरम्यान पिंटूच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अजय कुमारला ताब्यात घेतले आहे, त्याचसोबत त्याच्यावर डिएलएफ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल कऱण्यात आला. याचसोबत अजय कुमारकडून त्याची लायसेन्स बंदूक देखीत पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकऱणात पोलीस अधिकचा तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Sana Khan Bjp : भाऊ म्हणाला ‘ही सना खान नाही’, मग ‘तो’ मृतदेह कुणाचा?
ADVERTISEMENT