प्रिन्सिपल केबिनमध्ये बोलवायचा अन् विद्यार्थिनींसोबत… 50 पेक्षा अधिक मुलींचा खळबळजनक आरोप
शाळेतील विद्यार्थिनींना केबिनमध्ये बोलवून अश्लील कृत्य करायला लावणाऱ्या मुख्याध्यापकाविरोधात 50 पेक्षा अधिक मुलींनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत आता महिला आयोगनेही पाऊले उचलली आहेत. महिला आयोगाने पोलिसांवर ठपका ठेवत फरार असलेल्या मुख्याध्यापकावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ADVERTISEMENT

Sexual Assault : हरियाणामधील (Haryana) जिंदमध्ये 50 हून अधिक विद्यार्थिंनींचे लैंगिक छळ (Sexual harassment of students) केल्याचा आरोप शाळेच्या मुख्याध्यापकावर (Head Master) करण्यात आला आहे. या प्रकरणी हरियाणा राज्य महिला आयोगाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महिला आयोगाकडून (Commission for Women) शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले की, जिंद जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील 50 हून अधिक विद्यार्थिनींनी सांगितले की, मुख्याध्यापकाने आपल्याबरोबर असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दलही महिला आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation : शंभूराज देसाई छगन भुजबळांवर संतापले, ”मोठेपणा घेण्यासाठी…”
पोलीस कारवाईत दिरंगाई का?
विद्यार्थिंनींच्या लैंगिक शोषणाबद्दल महिला आयोगाने सांगितले की, शाळेतील काही विद्यार्थिनींनी याबाबतची तक्रार 14 सप्टेंबर रोजी पोलिसांकडे पाठवण्यात आली होती, मात्र त्यानंतर कित्येक दिवसांनी म्हणजेच 30 ऑक्टोबर रोजी कारवाई करण्यात आली. विद्यार्थिनींनी लैंगिक शोषण केल्याची तक्रार केल्यानंतर जिंद प्रशासनाकडून मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली आहे.
मुख्याध्यापक फरार
ही कारवाई झाल्यानंतर काही दिवसांनी सोमवारी हरियाणा पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुख्याध्यापकावर गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलीस पथकही त्याच्या घरी पाठवण्यात आले होते. मात्र मुख्याध्यापक फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याचे वय 55 आहे. मात्र तो सध्या फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा >> Crime: घरात शिरला आणि गळा घोटला…, महिला अधिकाऱ्याला ड्रायव्हरनेच का संपवलं?
तक्रारींची संख्या अनेक
पंचकुलामध्ये पत्रकारांशी बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी सांगितले की, आम्हाला विद्यार्थिनींकडून मुख्याध्यापकाविरोधात आता पर्यंत 60 लेखी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामधील 50 तक्रारी या अशा मुलींच्या आहेत ज्यांचे आरोपीकडून शारीरिक शोषण करण्यात आले आहे. तर 10 मुलींनी त्यांच्या तक्रारीत सांगितले आहे की, मुख्याध्यापकाकडून या प्रकारचे कृत्य करत असल्याचे त्यांना माहिती होते.
सर्व तक्रारदार अल्पवयीन
रेणू भाटिया यांनी या प्रकरणी पोलिसांवर टीका केली आहे. या प्रकरणातील सर्व तक्रारदार या अल्पवयीन आहेत. मात्र ज्या वेळी तक्रार दाखल झाली त्याचवेळी मुख्याध्यापकावर गुन्हा का दाखल झाला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याच्या गुन्हा दाखल होताच कारवाई झाली असती तर तो पळून गेला नसता असं म्हणत त्यांनी पोलिसांवरही जोरदार टीका केली आहे.
निष्काळजीपणामुळे आरोपी फरार
या प्रकरणाचे स्पष्टीकरण देताना रेणू भाटिया म्हणाल्या की, पीडित विद्यार्थिनीनी आरोप केला आहे की, मुख्याध्यापक विद्यार्थिनींनी कार्यालयात बोलवून अश्लील कृत्य करायला सांगत होता. त्यामुळे तक्रार दिल्या दिल्या त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपी फरार झाल्याचा ठपका पोलिसांवर ठेवण्यात आला आहे.
तक्रार थेट पोलीस अधीक्षकांकडेच
विद्यार्थिनींनी 13 सप्टेंबरला महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर चौकशी करुन आम्ही दुसऱ्याच दिवशी ही तक्रार पोलिसांकडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर 14 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबरच्या कार्यकाळात मुलींनी आमच्याशी पुन्हा संपर्क साधल्यानंतर थेट पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून या प्रकरणी आम्ही मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा नोंद केला.