Crime : 3 वर्षांपासून देत होता धमकी… अखेर विळा घेऊन आला अन् भर रस्त्यात कापलं महिलेचं नाक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Crime news : A young man attacked a woman with a sharp sickle and cut off her nose
Crime news : A young man attacked a woman with a sharp sickle and cut off her nose
social share
google news

Crime News :

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime) शाहजहांपूर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 3 वर्षांपासून देत असलेली धमकी खरी करत रस्त्याच्या मधोमध एका तरुणाने विळ्याने महिलेचं नाक कापल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ती जागीच बेशुद्ध झाली होती. जखमी महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (A young man attacked a woman with a sharp sickle and cut off her nose)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संजीव वाजपेयी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना खुटार भागातील एका गावातील आहे. पीडित महिला सोमवारी (3 एप्रिल) बाजारात खरेदीसाठी गेली होती. त्यावेळी गावातील राजेश नामक तरुणाने पीडितेची वाट अडवली. ‘आपल्याविरोधातील तक्रार मागे घे’ असं तरुणाने पीडित महिलेला दटावलं. मात्र महिलेने विरोध करताच तरुणाने धारदार विळ्याने महिलेवर हल्ला केला. यात महिलेचे नाक कापले गेले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : प्रेयसीचे दुसऱ्यावर जडलं प्रेम, नंतर…; बॉयफ्रेंडच्या कृत्याने चिंचवड हादरलं!

सध्या आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर रक्तस्त्राव होऊन पीडित महिला रस्त्यावर बेशुद्ध पडली होती. कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी महिलेचं कापलेलं नाक घेऊन पोलीस ठाणे गाठलं. पीडित महिलेची अवस्था पाहून पोलिसांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. जिथं सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : Crime : सनकी पित्याने दोन विवाहित मुलींची केली हत्या; पत्नी आणि नातू गंभीर जखमी

नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, 3 वर्षांपूर्वी आरोपी राजेश याने संबंधित महिलेचा विनयभंग केला होता. या विनयभंगप्रकरणी महिलेने आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात दाखल केला होता. हा खटला मागे घेण्यासाठी राजेशने अनेकवेळा महिलेचे नाक कापण्याची धमकी दिली होती. मात्र पीडित महिला हा गुन्हा मागे घेण्यासाठी तयार नव्हती. अखेरीस राजेशने अनेकदा देत असलेली नाक कापण्याची धमकी खरी केल्याने परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT