धक्कादायक! सख्ख्या बहिणीला वेश्या म्हणून विकलं, तीन मुलं असलेल्या पुरूषाकडेच..
सख्या बहिणीनेच आपल्या विवाहित बहिणीचा वेश्याव्यवसायासाठी तीन मुलाच्या बापाबरोबर सौदा करुन तिची विक्री केली आहे. तिचा फक्त 51 हजारला सौदा करुन तिच्या बहिणीच्या पतिचीही फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पोलिसात गेले आहे.
ADVERTISEMENT
Bihar Crime: बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये (Muzaffarpur Police) एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे सख्या बहिणीने आपल्या विवाहित बहिणीला तीन मुलांच्या वडिलांना 51 हजार रुपयांना विकले असल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखळ केली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. वेश्या व्यवसायासाठी (Prostitute) महिलेची विक्री झाल्याचे सांगण्यात आल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
बहिणाला ठेवले अंधारात
बिहारमधील मुजफ्फरपूरमधील सकरा परिसरातील ही घटना असून एका विवाहित महिलेने आपल्या सख्या बहिणीची विक्री केली आहे. या घटनेची माहिती मिळताच त्या महिलेच्या पतीने तक्रार दाखल केली आहे. ही घटना घडण्याआधी महिलेच्या बहिणीने तिला आधी समस्तीपूरमध्ये जेवणासाठी बोलवून घेतले होते.
हे ही वाचा >>ड्रग्स तस्कर ललित पाटीलच्या कशा आवळल्या मुसक्या?, पोलिसांनी सांगितली Inside Story
बाळ असतानाही केला सौदा
समस्तीपूरमध्ये लग्न करण्याच्या हेतून गावातीलच एका व्यक्तीबरोबर तिने आपल्या बहिणीचा 51 हजार रुपयांना सौदा केला होता. बहिणीकडे गेलेली बायको पुन्हा गावी परत आलीच नसल्याने तिचा नवरा आपल्या मेहुणीकडे गेला. त्यानंतर त्यांचे सहा महिनेच बाळ त्याच्या हातात देऊन तुमची पत्नी कुठेतरी बाहेर गेल्याचे सांगितले.
महिलेला फक्त 51 हजारांना विकले
गावात गेल्यानंतर सौदा झालेल्या महिलेच्या पतीने गावातील तरुणांबरोबर चर्चा केल्या नंतर त्यांना ही गोष्ट समजली. त्यांनी सांगितले की, महिलेला त्याच गावातील एका व्यक्तीला 51 हजार रुपयांना विकण्यात आले असून त्याच व्यक्तीबरोबर त्या महिलेने त्याच्याबरोबर लग्न केले असल्याची माहितीही त्याला समजली. त्यानंतर महिलेचा पती गावातील लोकप्रतिनिधींसह आपल्या मेहुणीच्या घरी गेला. त्यावेळी ती भेटली नाही. त्यामुळे त्यांनी मग पोलिसात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. पोलिसात तक्रार दाखल करताना त्यामध्ये आपल्या पत्नीला वेश्याव्यवसाय करण्यासाठी तिचा सौदा करण्यात आल्याची तक्रारीत म्हटले आहे.
प्रेम प्रकरणातून घडली घटना
या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असली तरी पोलिसांनी सांगितले की प्रेमप्रसंगातून ही घटना घडल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. मात्र आता महिलेची विक्री झाल्याचे समजल्यानंतर त्यानुसार आता तपास सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Adani : ‘शरद पवार पंतप्रधान असते, तर…’, राहुल गांधींनी पवारांना केले ‘सेफ’
तीन मुलांच्या बापाबरोबर सौदा
या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर सांगण्यात आले की, 8 दिवसांपूर्वी एका विवाहित महिलेला तिच्या बहिणीकडून तीन मुलं असणाऱ्या पुरुषाबरोबर बहिणीचा सौदा केला होता. त्यानंतर त्या महिलेचा पती पत्नीला घेऊन जाण्यासाठी आला तरी तिने सहा महिन्याच्या बाळाला त्याच्या हातात देऊन ती कुठेतरी बाहेर गेल्याचे तिने सांगितले. त्यामुळे तिचा संशय आल्यामुळेच माहिती काढल्यावर माझ्या बायकोचा तिच्या सख्ख्या बहिणीने सौदा केला होता असंही त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT