Crime: ‘माझी आई मरून जाईल’, डॉक्टरला घरी बोलवलं अन् तरुणी झाली नग्न; नंतर…
एका 22 वर्षीय तरूणीने एका डॉक्टरला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्याला ब्लॅकमेले केले आहे. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून डॉक्टरचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात पोलिसांनी 22 वर्षीय हिमानीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT
देशात हनीट्रॅपच्या आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. आता अशीच घटना समोर आली आहे. या घटनेत एका 22 वर्षीय तरूणीने एका डॉक्टरला हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्याला ब्लॅकमेले केले आहे. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून डॉक्टरचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणात पोलिसांनी 22 वर्षीय हिमानीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेलीमधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी नागरीकांना सतर्क राहण्याच्या सुचना देत, अशा प्रकणात तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. (22 year odl girl honey trapped doctor bareilly police arrested uttar pradesh crime story)
ADVERTISEMENT
घटनाक्रम काय?
बरेलीच्या पोलीस ठाणे हद्दीतील कॉलनीत एक डॉक्टर आपले क्लिनिक चालवायचा. 10 ऑक्टोबरला डॉक्टरला एका तरूणीचा कॉल आला होता. या तरूणीने तिचे बीएससी नर्सिंग झाल्याचे सांगत, जॉबची मागणी केली होती. मात्र डॉक्टरने वेळ नसल्याचा बहाना करत कॉल कट केला होता. या घटनेच्या 10 दिवसानंतर पुन्हा हिमानीने डॉक्टरला कॉल केला. ”माझ्या आईची तब्येत बिघडली आहे”. ”मला तुमच्या मदतीची गरज आहे”. ”तुम्ही तात्काळ घरी या”, असे तरूणीने डॉक्टरांना विनवणी केली.पण डॉक्टराने तिला आईला क्लिनिकमध्ये घेऊन येण्यास सांगितले होते.मात्र हिमानीने रडत रडत आईचे जीव वाचवा अशी विनंती केल्यावर डॉक्टराने घरी जाण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा : Crime : परफ्युम लावून घराबाहेर पडली, संतापलेल्या नवऱ्याचं भयंकर कृत्य
रूग्णाच्या काळजीपोटी घरी आला, अन्…
डॉक्टर घरी येताच हिमानीने आई आतल्या रूममध्ये अंथरूणावर पडली असल्याचे सांगत तिला तीव्र वेदना होत असल्याची माहिती दिली. यानंतर हिमानीने डॉक्टरसोबत अश्लील कृत्य करायला सुरुवात केली. हिमानीने डॉक्टरसमोर स्वत:चे कपडे देखील उतरवले. या दरम्यानच हिमानीचे साथिदार एक महिला आणि दोन पुरुष रूममध्ये आले आणि त्यांनी व्हिडिओ शुटींग करण्यास सुरुवात केली. यावेळी डॉक्टरचे कपडे देखील उतरवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यासोबत अश्लील व्हिडिओ बनवला गेला.
हे वाचलं का?
या घटनेनंतर हिमानीने डॉक्टरला अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरून डॉक्टरने हिमानीला एटीएमचा पासवर्ड सांगितला. यानंतर हिमानीने डॉक्टरच्या खात्यातून तीनदा 50 हजाराची रक्कम काढली. यानंतर पुन्हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 1 लाख रूपयाची मागणी केली. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून डॉक्टरने अखेर सुभाषनगर पोलीस ठाण्यात प्रिया गंगवार (हिमानी) विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी तरूणीवर 420,342,384,504,506,120 बीनुसार गुन्हा दाखल केला होता. यामध्ये एक महिला आणि दोन तरूणांचा देखील समावेश होता.
या दरम्यान हिमानी डॉक्टरला वारंवार फोन करून फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होती. यासोबत पैशांची देखील मागणी करत होती. या वारंवार धमकीमुळे अखेर धक्क्याने डॉक्टरचा मृत्यू झाला होता. डॉक्टरच्या मृत्यूनंतर पोलिसांनी हिमानीला अटक केली.या अटकेनंतर हिमानीने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Love मॅरेजनंतरही बायको फिरत होती दुसऱ्यासोबत, नवऱ्याने मागून जाऊन..
या प्रकरणावर एसपी राहुल भाटी म्हणाले की, जर कोणताही नागरीक हनीट्रॅपसारख्या गुन्ह्याचा शिकार होतो, त्यावेळेस त्यांनी ही घटना लपवू नये, ब्लॅकमेलरच्या धमक्यांनाही घाबरू नये, अशा प्रकरणात लगेचच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा असे आवाहन राहुल भाटी यांनी केले आहे. डॉक्टरला ब्लॅकमेल करणाऱ्या तरूणीला ताब्यात घेतले आहे, या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT