Santosh Deshmukh Murder Case: "वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं...", जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने खळबळ
Jitendra Awhad On Dhananjay Munde: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टने खळबळ उडवली. संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर
CM देवेंद्र फडणवीसांनी दिले न्यायालयीन चौकशीचे आदेश
जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केले गंभीर आरोप
Jitendra Awhad On Dhananjay Munde: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टने खळबळ उडवली. संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या घटनेनं संपूर्ण राज्याला हादरवून टाकलं असून फडणवीसांनी या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. "वाल्मिक कराडच्या विरोधात पुरावे दाखल झाल्यास गुन्हे दाखल केले जातील. शरद पवार यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता जरी असला, तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशमुखांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT
जितेंद्र आव्हाडांनी धनंजय मुंडेवर केले गंभीर आरोप
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत. तुम्ही वाल्मिक कराडची चौकशी कसली करता? तुमच्या बरोबर फोटो आहेत, पण आम्हाला माहितीय तुमचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचंय का धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाही. वाल्मिक कराड सीरियल कीलर आहे. तो विकृत आहे. रामन राघव ज्या मानसिकतेचा होता, त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे. एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय. एसआयटी करतोय. एसआयटीचा अधिकारी धनंजय मुंडेंसमोर तोंड उघडेल का? तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलत. ज्या खंडणीतून ही हत्या झाली, ती खंडणी वाल्मिक कराडने मागीतली आहे. जर वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहे, तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी? आणि स्वत: मंत्री महोदय ताठ मानेने जगाला सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे. हे टीव्हीवर स्वत: धनंजय मुंडे येऊन सांगत आहेत.
हे ही वाचा >> Kalyan Marathi Family: 'माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय...', फडणवीसांनी एका झटक्यात 'त्या' अधिकाऱ्याला...
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर धनंजय मुंडे काय म्हणाले?
विरोधकांनी काही बोललं की मग माझ्याकडून काहीतरी जाणार.. मग त्यामध्ये नक्कीच मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण होणार..एकदा दूध का दूध, पाणी का पाणी कळावं..आणि ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातून कळालं आहे. मी सुरुवातीपासून म्हणतोय, हे व्यवहारातून झालेलं भांडण आहे. ज्यामुळे संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली आहे. अशाप्रकारे हत्या झाली आहे की, त्याचं समर्थन कुणीच करू शकत नाही. त्यामुळे सर्वच आरोपी अटक झालेले आहेत. या प्रकरणात आमच्या सर्वांचीच तीव्र भावना होती. त्यात एसआयटी नेमली आहे. सीआयडी नेमल्यानंतर आता शेवटपर्यंत याचा तपास होणार आहे. यामध्ये मोकोका लावण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री जे काही बोलले, त्यात सर्वांच समाधान झालेलं आहे. माझ्यावर आरोप करण्याचे अनेक प्रकार या सदनात घडले आहेत. या सर्व गोष्टींमध्ये दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे.
हे ही वाचा >> Sanjay Raut : "जीवाला धोका निर्माण झाला, तरी...", घराच्या रेकी प्रकरणावरून खासदार संजय राऊत संतापले
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT