Thane Crime : ठाण्यात गुन्हेगारीची मालिका सुरूच, 60 वर्षीय महिलेला घरात घुसून संपवलं, समोर आलं 'हे' कारण

मुंबई तक

रजनी पाटकर या कल्याणमधील गृहसंकुलातील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये एकट्या होत्या.  गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या घरात काही दरोडेखोर घुसले. जबरदस्तीने घरात घुसल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाण्यात 60 वर्षीय महिलेची घरात घुसून हत्या

point

महिलेचं मंगळसुत्र आणि इतर दागिने गायब

point

रक्ताच्या थारोळ्यात पडली होती महिला

Thane Crime News : गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होतोय. त्यातच आता पुन्हा एका घटनेनं ठाणे जिल्हा हादरला आहे. एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, 60 वर्षीय महिलेची तिच्याच घरात हत्या करण्यात आली आहे. दागिने लुटण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी ही हत्या केली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली.

हे ही वाचा >> जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी घेताना अटक, महिलेनं काय मागणी केली होती?

रजनी पाटकर या कल्याणमधील गृहसंकुलातील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये एकट्या होत्या.  गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या घरात काही दरोडेखोर घुसले. जबरदस्तीने घरात घुसल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असं पोलिसांनी सांगितलं. पाटकर या रक्ताच्या थारोळ्यात सापडल्या आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसर चांगलाच हादरला आहे.

घरातून रजनी यांचं मंगळसूत्र व इतर दागिने गायब असल्याचं पोलिसांना आढळून आलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. लवकरात लवकर आरोपी शोधण्यात येतील असं पोलिसांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा >> इंडिया टुडे GDB सर्व्हे: महाराष्ट्र सेफ की अनसेफ, सार्वजनिक सुरक्षेत कितवा क्रमांक.. कोण आहे अव्वल स्थानी?

दरम्यान, फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात आर्थिक वादातून एक अशीच घटना घडली होती. 42 वर्षीय महिलेची सार्वजनिक ठिकाणी चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती.पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचं नाव सीमा कांबळे असं आहे. दुपारी अंबरनाथच्या बरकुपाडा भागात सीमा कांबळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

कांबळे यांचा शेजारी राहणाऱ्या राहुल डिंगरकर याच्याशी उधारीमुळे सतत वाद होत होते. एक दिवस तुफान खडाजंगी झाल्यानंतर डिंगरकर यांने चाकू काढला आणि कांबळे यांच्यावर अनेक वार केले. यामुळे त्या जागीच कोसळल्या होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp