Nikita Rawal: मुंबईत हे चाललयं तरी काय? अभिनेत्रीवर रोखलं पिस्तुल अन्, नंतर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

actress-nikita-rawal-gold-and-3-5-lakh-looted-from-house-at-gunpoint
actress-nikita-rawal-gold-and-3-5-lakh-looted-from-house-at-gunpoint
social share
google news

Nikita Rawal: गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत राहिले आहे. खून, दरोडे आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच मुंबईतील एका अभिनेत्रीला तिच्याच घरात तिला लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेत्री निकिता रावल (Actress Nikita Rawal) ही मुंबईमधील मालाड (Malad, Mumbai) परिसरात राहते. मात्र तिला एका वेगळ्याच घटनेला सामोरे जावे लागत आहे. निकिता रावल हिला बंदुकीच्या धाकावर लुटण्यात आले असून तिच्या घरातील पैशांसह आणखी काय काय लंपास करण्यात आले आहे. त्याचीही शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी मालाड बांगूरनगर (Malad Bangurnagar) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निकिताच्या घरात करण्यात आलेली चोरी ही त्यांच्याच घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली असल्याचे सांगितले जात आहे.

ADVERTISEMENT

कर्मचाऱ्याचाच होता हात

निकिता रावल हिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे, त्यामध्ये तिने म्हटले आहे की, ती घरी असतानाच तिच्या घरातील कर्मचाऱ्यांनी तिच्या घरातील साडेतीन लाख रुपये घेऊन ते फरार झाले आहेत. ही चोरी करण्यामध्ये तिच्याच घरातील एक कर्मचारी असल्याचे तिने त्या तक्रारीत म्हटले आहे. मात्र पोलिसांनी या लुटालूटीच्या प्रकरणात आणखी काही जणांचा हात असल्याची शक्यता वर्तवली आहे.

हे ही वाचा >> शरद पवारांना दिवाळीत ‘झटका’! बडा नेता अजित पवारांकडे जाणार, कॅबिनेटमंत्र्याचा दावा

गुंडाकडून धमक्या

निकिता रावलने पोलिसात तक्रार दाखल करुनही तिला काही गुंडाकडून धमक्या देण्यात येत आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर गळा चिरण्याचीही तिला धमकी देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

निकिताचा बॉलिवूडचा प्रवास

निकिता रावलने अनेक बॉलिवूडच्या चित्रपटातून काम केले आहे. अभिनेता अनिल कपूरच्या ब्लॅक अँड व्हाइट तर जॉन अब्राहम तिने गरम मसाला या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

हे ही वाचा >> Samruddhi Accident :…तर 12 जणांचे वाचले असते प्राण; RTO अधिकाऱ्यांसह तिघांना अटक

मानसिक धक्का

निकिता रावलच्या घरी चोरी झाली असली तरी तिला तिच्याच घरातील कर्मचाऱ्याने ही चोरी केल्याने तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे. ती म्हणाली की, माझ्या घरातील पैसे आणि दागिनेही त्यांनी चोरून घेऊन गेले आहेत. मात्र ही चोरी करुन झाल्यानंतरही त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकारामुळे मला मोठा मानसिक धक्का बसला असल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT