Akola Crime: बदलापूरपाठोपाठ अकोलाही हादरलं! शाळेतील ६ मुलींवर विनयभंग, आरोपी शिक्षक गजाआड, नेमकं काय घडलंय?
Akola School Girls Molestation Case: बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना ताजी असतानाच अकोल्यातही शाळकरी मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलं आहे. अकोल्यातील काजीखेडच्या जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालयात ही धक्कादायक घटना घडलीय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बदलापूरच्या घटनेनंतर अकोल्यात शाळकरी मुलींच्या विनयभंगाची घटना
शिक्षक चार महिन्यांपासून मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवायचा आणि...
पोलिसांनी आरोपी शिक्षकाला ठोकल्या बेड्या
Akola School Girls Molestation Case: बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटना ताजी असतानाच अकोल्यातही शाळकरी मुलींचा विनयभंग झाल्याचं समोर आलं आहे. अकोल्यातील काजीखेडच्या जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालयात ही धक्कादायक घटना घडलीय. प्रमोद सरदार नावाच्या शिक्षकाने शाळेतील ६ मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित मुलींच्या पालकांना या गंभीर घटनेबाबत समजल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे.(it has come to light that school girls have been sexually abused in Akola as well. This shocking incident took place in Zilla Parishad Higher Secondary School of Kazikhed in Akola)
ADVERTISEMENT
शिक्षक चार महिन्यांपासून मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवायचा आणि...
शिक्षक चार महिन्यांपासून आठवीत शिकणाऱ्या मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा, असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर एका विद्यार्थ्याने चाईल्ड वेलफेयर सेंटरच्या टोल फ्री हेल्पलाईनवर फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर केंद्रातील अधिकारी शाळेत पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणी उराल पोलिसांनी तातडीनं आरोपी शिक्षक प्रमोद सरदारवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा >>Bharat Bandh: आज 'भारत बंद'ची हाक! काय सुरू आणि काय बंद राहणार? जाणून घ्या एका क्लिकवर
"'२० ऑगस्ट २०२४ रोजी बाल कल्याण समिती सदस्य प्रांजली जयस्वाल यांनी या प्रकरणाबात उराल पोलीस स्टेशनमध्ये फोनद्वारे माहिती दिली. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा काजीखेड येथील शिक्षक प्रमोद मनोहर सरदारने सहा मुलींचं विनयभंग केलं, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शिक्षकाला ताब्यात घेतलं. पीडितेच्या तक्रारीनुसार पोक्सो काद्यान्वये गुन्हा दाखल केला. तसच आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे", अशी माहिती पोलिस अधिकारी गोपाल ढोले यांनी दिली आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Maharashtra Breaking News : बदलापूर स्टेशनबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त, आज इंटरनेट सेवाही राहणार बंद
बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेमुळं प्रशासनाच्या झोपा उडाल्या
बदलापूरच्या आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घटनेमुळं प्रशासनाची झोप उडाली आहे. पीडित मुलींना न्याय देण्याच्या मागणीसाठी संतप्त पालकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन केलं. सकाळी ९ वाजल्यापासून बदलापूरच्या नागरिकांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर रेलरोको करत संतापलेल्या नागरिकांना प्रशासनाला धारेवर धरलं. लोकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळं जवळपास ९ तास रेल्वेसेवा ठप्प झाली होती. मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची वाहतूक थांबवल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT