Badlapur: 'तो एखादा हैवान किंवा लिंगपिसाटासारखा...', अक्षय शिंदेंच्या पहिल्या पत्नीनं सांगितलं भीषण सत्य
Badlapur sexual assault case: बदलापूर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीने अत्यंत भीषण सत्य हे एसआयटीला सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बदलापूरमधील दोन चिमुरड्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक माहिती
नराधम आरोपी अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीनं सांगितलं भीषण
पहिली पत्नी लग्नाच्या 5 दिवसातच अक्षयला गेली सोडून
बदलापूर: बदलापूर प्रकरणात रोज नवनव्या आणि धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता दोन चिमुरड्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणात नराधम आरोपी अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीनं धक्कादायक आणि हादरवून टाकणाऱ्या गोष्टी सांगितल्याचं समोर आलं आहे. (akshay shinde first wife in badlapur sexual assault case has told sit the most gruesome truth)
ADVERTISEMENT
अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीने सांगितलं हादरवून टाकणारं सत्य...
या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आरोपीच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवला आहे. ती पालघर जिल्ह्यातील एका गावात राहत असल्याची माहिती आहे. आरोपी अक्षयचं पहिलं लग्न झाल्यानंतर त्याची ही पहिली पत्नी लग्नाच्या अवघ्या पाच दिवसात माहेरी निघून गेली होती. अक्षय शारिरीक संबंधावेळी हिंसकपणे वागायचा. त्याची वृत्ती एखादा हैवान किंवा लिंगपिसाटासारखी होती. त्यामुळे लग्नाच्या अवघ्या पाच दिवसात ती माहेरी निघून गेली आणि पुन्हा कधीच परतली नाही.
हे ही वाचा>> 'आरोपी अक्षय शिंदे मुलींच्या टॉयलेटमध्ये...', बदलापूर प्रकरणाच्या सर्वात धक्कादायक रिपोर्टने खळबळ!
त्या पाच दिवसात अक्षयची लैंगिक वासना पाहता तो कोणतंही भयंकर आणि क्रूर कृत्य करू शकतो. दरम्यान, याबाबत त्याच्या विरोधात साक्ष द्यायला तयार असल्याचं तिने आपल्या जबाबात म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाला एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अक्षयला कठोर शिक्षा होण्यासाठी त्याच्या पहिल्या पत्नीचा जबाब टर्निंग पॉइंट ठरू शकतो.
हे वाचलं का?
अक्षयच्या पहिल्या पत्नीच्या या जबाबामुळं बदलापूर प्रकरणात पोलिसांना चौकशीच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळू शकतो. या महिलेच्या साक्षीमुळे अक्षयसारख्या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा मिळायला मदत होऊ शकते.
हे ही वाचा>> Crime News: 70 वर्षाच्या महिलेला घरी बोलावलं, बलात्कार करुन हत्या.. दोन दिवस मृतदेहसोबत काय करत होता आरोपी?
बदलापूर प्रकरणातील तपासादरम्यान मिळेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे याने तीन वेळा लग्न केलं होतं. यातील पहिल्या दोन पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेल्या होत्या. तर त्याच्यासोबत राहणारी तिसरी पत्नी ही गर्भवती आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणात शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे, याशिवाय मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्याविरोधातही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरु असून आणखी काय-काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
'त्या' घटनेनंतर कुटुंबीय गेले घर सोडून
अक्षय शिंदेला अटक केल्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ परिसर सोडलं आणि घराला कुलूप लावून ते कुठे तरी निघून गेले. दरम्यान, बुधवारी संतप्त लोकांनी आरोपीच्या घराची तोडफोड केली. शिंदे याला बुधवारी दुसऱ्यांदा पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले होते. ज्यानंतर न्यायालयाने 26 ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. त्याचबरोबर आयजी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली एसआयटी देखील आता या प्रकरणाचा तपास करत आहे. विशेष तपास पथकाने बदलापूर पोलिसांकडून हा तपास हाती घेतला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT