Sana Khan Murder : भाऊ म्हणाला ‘ही सना खान नाही’, मग ‘तो’ मृतदेह कुणाचा?

योगेश पांडे

ADVERTISEMENT

the body of Nagpur's BJP leader Sana Khan has not been found yet.
the body of Nagpur's BJP leader Sana Khan has not been found yet.
social share
google news

Sana Khan Murder : नागपूर येथील भाजप पदाधिकारी सना खानच्या हत्येनंतर पोलिसांना सनाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. मृतदेहाच्या शोधात गुंतलेल्या बचाव पथकाने हिरण नदीच्या अनेक किलोमीटर परिसरात शोधमोहीम राबवली. अद्याप तरी मृतदेहाचा कोणताही सुगावा त्यांना लागला नाही. यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. (BJP leader Sana Khan’s murder mystery)

ADVERTISEMENT

या हत्याकांडात आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दुसरीकडे, हरदा येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली, तेव्हा सनाच्या भावाने सांगितले की, हा मृतदेह त्याच्या बहिणीचा नाही. त्यामुळे सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा असा नवा पेच पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.

वाचा >> ‘बायको आत्महत्या करेल सांगून शिंदेंकडून घेतलं मंत्रिपद’, भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब

या हत्येचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे दोन अधिकारी जबलपूरमध्ये तळ ठोकून आहेत. आता पुरावे गोळा करण्यासाठी नागपूरहून फॉरेन्सिक टीम शहरात आहे. हे पथक आरोपी अमित साहूचे घर, ढाबा आणि कारची तपासणी करणार आहेत. सना खान 1 ऑगस्ट रोजी नागपूरहून जबलपूरला निघाली होती. 2 ऑगस्ट रोजी सकाळी ती पती अमित उर्फ पप्पू साहू याच्या बिल्हारी राजुल टाऊन येथील घरी पोहोचली. येथे पोहोचल्यानंतर सनाचा पती अमित साहूसोबत वाद झाला.

हे वाचलं का?

या वादातून अमित साहूने सनावर काठीने वार करून तिची हत्या केली. हत्येनंतर अमितने राजेश सिंग या त्याच्या साथीदाराच्या मदतीने मृतदेह हिरण नदीत फेकून दिला. या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांनी सनाचा पती अमित आणि त्याच्या साथीदाराला अटक करून त्यांची कसून चौकशी केली.

वाचा >> Lok Sabha Election : मोदीच येणार, पण…; नव्या सर्व्हेने भाजपचं वाढलं टेन्शन!

चौकशीत आरोपींनी खून केल्यानंतर मृतदेह नदीत फेकल्याची कबुली दिली. यानंतर 12 ऑगस्टपासून नागपूर आणि जबलपूर पोलीस मृतदेहाच्या शोधात गुंतले होते, मात्र मृतदेहाचा कोणताही सुगावा न लागल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली.

ADVERTISEMENT

सना खानचा मृतदेह सापडलेला नाही, तसेच तिच्या मोबाईल व बॅगचाही सुगावा मिळालेला नाही. त्यामुळे नागपूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्यासाठी त्याच्या बिल्हारी येथील घराची फॉरेन्सिक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

सना खानचा भाऊ म्हणाला माझ्या बहिणीचा मृतदेह नाही

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी एका विहिरीत मृतदेह सापडला होता. आठ दिवस उलटूनही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी शवविच्छेदन केल्यानंतर हा मृतदेह शवागारात ठेवला आहे. दुसरीकडे, नागपूरच्या भाजप नेत्या सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.

हा मृतदेह त्यांचाच असावा, असा संशय नातेवाइकांना आहे. त्यामुळे सना खानचे कुटुंबीय ओळखीसाठी नागपुरातून हरदा येथे पोहोचले. दरम्यान, मृतदेह पाहिल्यानंतर सनाचा भाऊ मोहसीन म्हणाला की, हा मृतदेह त्याच्या बहिणीचा नाही. आता मृतदेहाजवळ सापडलेल्या साहित्याचीही तपासणी करण्यात येणार आहे.

सना खान अमित साहूची होती बिझनेस पार्टनर

भाजप अल्पसंख्याक मोर्चाची सरचिटणीस असलेली सना खान नागपूरहून जबलपूरला पोहोचली. सना खानचा पती अमित साहू जबलपूरमध्ये ढाबा चालवतो. सना ही पती अमितची बिझनेस पार्टनर असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला. यामुळे अमितने सनाचा खून करून मृतदेह नदीत फेकून दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT