अत्याचार प्रकरणातला आरोपी विशाल गवळीने स्वत:ला कसं संपवलं? कशी होती 'चीड आणणारी' क्राईम हिस्ट्री?
Kalyan Crime News : पोलिसांनी तपासादरम्यान मुख्य आरोपी म्हणून विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांचा सहभाग असल्याचं उघड केलं. विशाल गवळी याला त्याच्या पत्नीच्या माहेरी, बुलढाणा येथील शेगांव येथून अटक करण्यात आली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

तळोजा तुरूंगात आरोपी विशाल गवळीने काय केलं?

विशाल गवळीची क्राईम हिस्ट्री नेमकी काय होती?
Vishal Gawli Taloja Jail : ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये 12 वर्षीय मुलीचं अपहरण, बलात्कार आणि हत्येची घटना घडली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळी तळोजा तुरुंगात होता. याच आरोपीनं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यानं तुरुंगातील शौचालयात टॉवेलचा वापर करून गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचा मृतदेह पुढील तपासणीसाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
तुरूंगात काय घडलं? फाशी कशी घेतली?
विशाल गवळी गेल्या साडेतीन महिन्यांपासून तळोजा तुरुंगात होता. खारघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याने तुरुंगातील शौचालयात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. त्याच्या आत्महत्येच्या कारणांचा तपास सुरू आहे, आणि मृतदेहाचं पोस्टमॉर्टम जे.जे. रुग्णालयात होत आहे.
डिसेंबर 2024 मध्ये काय घडलं होतं?
गेल्या वर्षी 23 डिसेंबर 2024ला कल्याण पूर्व भागातून एका 12 वर्षीय मुलीचं अपहरण झालं होतं. ही मुलगी आपल्या आईकडून 20 रुपये घेऊन दुकानात सामान खरेदी करण्यासाठी निघाली होती. मात्र, ती घरी परतलीच नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यानंतर वडिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी, 24 डिसेंबरला, मुलीचा मृतदेह भिवंडी-बापगांव परिसरातील कब्रस्तानाजवळ आढळला. पोस्टमॉर्टम अहवालात मुलीवर बलात्कार झाल्याचं आणि तिची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं.
हे ही वाचा >> IPS अधिकाऱ्यावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल, नागपूरमधील डॉक्टर महिलेने काय आरोप केले?
पोलिसांनी तपासादरम्यान मुख्य आरोपी म्हणून विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांचा सहभाग असल्याचं उघड केलं. विशाल गवळी याला त्याच्या पत्नीच्या माहेरी, बुलढाणा येथील शेगांव येथून अटक करण्यात आली होती. तर साक्षी गवळीला कल्याणमधून ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणात एका ऑटोरिक्षा चालकालाही अटक करण्यात आली होती. पोलिसांनी हत्येत वापरलेली ऑटोरिक्षाही जप्त केली होती.
विशाल गवळीची क्राईम हिस्ट्री
पोलिसांच्या तपासात असंही समोर आलं की, विशाल गवळी हा सराईत गुन्हेगार होता आणि त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्या गुन्हेगारी कारनाम्यांमध्ये खालील गोष्टींचा
प्राणघातक हल्ला, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तडीपार आदेशाचे उल्लंघन, एका मुलावर बलात्कार, दरोडा, अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्या (सध्याचे प्रकरण). असा इतिहास विशाल गवळीचा होता.
कल्याणमध्ये घडलेल्या या क्रूर हत्याकांडानंतर कल्याण परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला होता. अनेकांनी रस्त्यावर उतरून निषेध मोर्चे काढले आणि आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली होती. काहींनी तर विशाल गवळीचा एन्काउंटर करावा, अशी मागणी केली होती. स्थानिक जिला न्यायालय बार असोसिएशननेही आपल्या वकिलांना विशाल आणि साक्षी गवळी यांचे कोर्टात प्रतिनिधित्व न करण्याचे आवाहन केलं होतं.
हे ही वाचा >> 3 दिवस पत्नीसोबत, 3 दिवस दुसऱ्या बाईसोबत..पण नंतर घडला धक्कादायक प्रकार, काय आहे लव्ह ट्रँगल?
दरम्यान, या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याचे होईल असं आश्वासन दिलं होतं. तसंच विशाल गवळीच्या आत्महत्येमुळे या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया कशी पुढे जाईल, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
तळाजोत असणाऱ्या अक्षय शिंदेचाही झाला होता एन्काऊंटर
अक्षय शिंदे या आरोपीचाही काही दिवसांपूर्वी कथितरित्या पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात न्यायालयाने पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे या प्रकरणातही आत्महत्या आहे की आणखी काही हे शोधणं महत्वाचं ठरणार आहे.