भाजप आमदाराच्या मामीनेच काढला मामाचा काटा, 'या' कारणामुळे संपवलं पतीला!

मुंबई तक

Satish wagh Murder Wife Arrest: भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणी अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. जाणून घ्या नेमकी अपडेट.

ADVERTISEMENT

भाजप आमदाराच्या मामीनेच काढला मामाचा काटा, 'यासाठी' संपवलं पतीला!
भाजप आमदाराच्या मामीनेच काढला मामाचा काटा, 'यासाठी' संपवलं पतीला!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजप आमदाराच्या मामाच्या हत्येबाबत धक्कादायक माहिती समोर

point

आमदार योगेश टिळेकरांच्या मामीचे काढला मामाचा काटा

point

मामीनेच दिली मारेकऱ्यांना 5 लाखांची सुपारी

ओमकार वाबळे, पुणे: भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण आणि निर्घृण हत्येप्रकरणी आता अत्यंत धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.  पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल (24 डिसेंबर) या प्रकरणातील प्रमुख मारेकऱ्याला अटक केली होती. ज्यानंतर आज त्याची कसून चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये त्याने अशा व्यक्तीचं नावं घेतलं की, पोलिसांना देखील धक्का बसला. या संपूर्ण हत्या प्रकरणाची मुख्य सूत्रधार ही सतीश वाघ यांची पत्नीच असल्याचं आता समोर आलं आहे. (bjp mlc yogesh tilekar relative satish wagh murder case his wife mohini wagh is mastermind behind the crime paid supari of 5 lakh rs for murder)

पती सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनीच मारेकऱ्यांना दिली असल्याचं मारेकऱ्यांनी कबूल केल्याने या संपूर्ण प्रकरणालाच वळण मिळालं आहे.

हे ही वाचा>> Kalyan Crime News : 20 रुपये घेऊन दुकानात गेलेल्या मुलीचं अपहरण करुन खून, कल्याणमध्ये संतापजनक घटना

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या म्हणण्यानुसार, प्रमुख आरोपी आतिश जाधव याने चौकशीदरम्यान कबूल केले की, सतीश वाघ यांच्या पत्नीने पतीच्या हत्येसाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती. याच कबुली जबाबानंतर पोलिसांनी सतीश वाघ यांच्या पत्नीला आज (25 डिसेंबर) सायंकाळी अटक केली.

"आरोपी आतिश जाधवने कबूल केले की त्याला सतीश वाघ यांच्या पत्नीकडून हत्येसाठी 5 लाख रुपये मिळाले होते. अपहरण आणि हत्येमागे तिची भूमिका तपासात उघड झाली आहे," असे उच्च पोलीस अधिकाऱ्याने मुंबई Tak शी बोलताना सांगितले.

मामाचं प्रेमप्रकरण अन् मामीने दिली सुपारी

दरम्यान, आमदार योगेश टिळेकर यांच्या मामीनेच स्वत:च्याच पतीच्या हत्येसाठी सुपारी का दिली याची माहिती देखील आता समोर आली आहे. पतीचं प्रेमप्रकरण असल्याचं समजल्यानेच पत्नीने सतीश वाघ यांच्या हत्येसाठी तब्बल 5 लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचीही चर्चा आहे.

हे ही वाचा>> Thane Crime News : काळ्या रंगाची साडी दिली नाही म्हणून, दुकानदारावर हल्ला, उल्हासनगरमध्ये काय घटना घडली?

नेमकी कशी झाली होती हत्या?

9 डिसेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास पुण्यातील यवत परिसरात मॉर्निंग वॉक करत असताना सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आले होते. सीसीटीव्ही फुटेजवरून त्यांचे अपहरण झाल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी 48 तासांत पहिल्या आरोपीला अटक केली होती. खेदाची बाब म्हणजे वाघ यांचा मृतदेह पुण्याजवळील शिंदेवणे घाटात सापडला होता. त्यांच्यावर तब्बल 70 वार करण्यात आले होते.

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत चारपैकी तीन आरोपींना अटक केली असून त्यात धुळे येथील पवन शर्मा आणि फुरसुंगी येथील नवनाथ गुराळ यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी जाधव याला धाराशिव येथून अटक करण्यात आली.

हे वाचलं का?

    follow whatsapp