कुख्यात गुंड शरद मोहोळच्या थरारक हत्याकांडाचे CCTV फुटेज आलं समोर, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

CCTV footage of the notorious gangster Sharad Mohol thrilling murder has surfaced and two lawyers are also involved
CCTV footage of the notorious gangster Sharad Mohol thrilling murder has surfaced and two lawyers are also involved
social share
google news

Sharad Mohol Murder: सराईत गुन्हेगार शरद मोहोळ खून प्रकरणात पुणे पोलिसांना आता मोहोळच्या थरारक हत्याकांडचा सीसीटीव्ही फुटेज समोल आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणात आता दोन वकिलांनाही पोलिसांना ताब्यात घेतले आहे. रवींद्र पवार (Ravindra Pawar) आणि संजय उड्डाण अशी अटक करण्यात आलेल्या वकिलांची नावे आहेत. दोघेही शिवाजी नगर सत्र न्यायालयात वकिली करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आज शरद मोहोळच्या हत्येचा सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांना मिळाला असून त्यामध्ये ही घटना सगळी कैद झाली आहे.

ADVERTISEMENT

थरारक प्रसंग CCTV मध्ये

शरद मोहोळच्या हत्येचा जो व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये शरद मोहोळ एका गल्लीतून चालत जाताना दिसत आहे. तर तो जात असताना दबा धरून बसलेल्या ह्ललेखोराने त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार केला आहे. त्यानंतर तो खाली कोसळला आहे. त्याच्या साथीदाराने त्याला उचलण्याचाही प्रयत्न करत आहेत, मात्र तो निपचित पडल्याचे त्यामध्ये दिसत आहे.

हे ही वाचा >> मलंगगडावरून ओवैसींनी शिंदेंवर साधला निशाणा, तुम्हाला बाबरीमुळेचं…

आर्थिक व्यवहार

पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणात आठ जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले पिस्तूल, काडतुसे, मोटार हे साहित्यही जप्त केले आहे. या हत्या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शरद मोहोळचा साथीदार साहिल उर्फ मोन्या पोळेकरने जमीन खरेदीच्या आर्थिक व्यवहारातूनन मोहोळवर गोळीबार केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

साथीदारानेच केला घात

शरद मोहोळ हत्ये प्रकरणी आता धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. कारण आज शनिवारी मोहोळच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर त्याच्याजवळच्या साथीदाराने त्याचा घात केल्याचे सांगितले जात आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पुण्यातील अनेक रस्त्यावर नाकेबंदी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी काही तासातच आरोपींना अटक केली आहे.

हे ही वाचा >> अखेर आमदार सुनील कांबळेंवर गुन्हा दाखल, कानशिलात लगावलेलं प्रकरण भोवणार

    follow whatsapp

    ADVERTISEMENT