Palghar: लहान मुलांनी उघडली बेवारस सुटकेस, सापडलं महिलेचं छाटलेलं मुंडकं

मुंबई तक

गुरुवारी संध्याकाळी पीरकुंडा दर्ग्याजवळ ही घटना घडली. काही मुलांना तिथे एक सुटकेस टाकून दिलेली दिसली. मुलांनी ती सुटकेस जवळ जाऊन उघडली.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पालघरमध्ये सुटकेसमध्ये आढळलं महिलेचं शीर

point

छिन्नविछिन्न अवस्थेतलं शीर पाहून लाहन मुलं हादरले

point

मांडवी पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत घटनास्थळ गाठलं

Palghar : पालघरमधील विरार परिसरात एका बेवारस सुटकेसमध्ये महिलेचं छाटलेलं शीर सापडल्याने खळबळ उडाली आहे. सूटकेसमध्ये महिलेचं जे छाटलेलं मुंडकं आढळून आलं ते अत्यंत छिन्नविच्छिन्न अवस्थेत होतं. त्यामुळे अद्याप मृत्य महिलेची ओळख पटू शकलेली नाही. दरम्यान, ही संपूर्ण घटना काही लहान मुलांमुळे उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून, त्यावरुन पुढील तपास केला जाईल.

हे ही वाचा >> Apple iPhone 17 ला मिळणार कुलिंग चेंबर, काय आहे हे भन्नाट फिचर? 

नेमकी घटना काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी पीरकुंडा दर्ग्याजवळ ही घटना घडली. काही मुलं ही या परिसरात खेळत असताना अचानक त्यांना तिथे एक बेवारस सुटकेस दिसली. सुटकेस मोठी असल्याने त्यामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी लहान मुलं त्या सुटकेस जवळ गेली. मुलांनी ती सुटकेस जवळ जाऊन उघडली. पण सुटकेस उघडताच मुलांची बोबडीच वळली. कारण सुटकेसमध्ये त्यांना एका महिलेचे छाटलेले मुंडकं आढळून आलं. घाबरलेल्या अवस्थेत मुलांनी ही माहिती तेथील त्यांनी स्थानिक लोकांना दिली. ज्यानंतर स्थानिकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

इतक्या निर्घृणपणे कोणत्या महिलेची हत्या करण्यात आली आहे आणि हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे? याचा आता पोलीस कसून शोध घेत आहेत.

महिलेचं छाटलेलं मुंडकं सापडलं पण...

प्राथमिक तपासानंतर हा नियोजित खूनाचा प्रकार असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ';आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून, बेपत्ता महिलांचे अहवाल तपासले जात आहेत. यातूनच पीडितेची ओळख पटू शकेल.'

हे ही वाचा >> Lilavati Hospital: मानवी हाडे, केस आणि 8 कलश... चक्क लीलावतीत काळी जादू, काय आहे सगळं प्रकरण?

मांडवी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, 'आमचं पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पीडितेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे.'

यासोबतच मृत महिलेच्या शरीराचे इतर अवयव कुठे आहेत याचा देखील आता पोलीस शोध घेत आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

 

हे वाचलं का?

    follow whatsapp