बिग बॉस फेमला अटक; 500 किलोमीटर पाठलागानंतर बेड्या : काय घडलं नेमकं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Delhi Police chased Bigg Boss fame super thief Bunty to Kanpur and arrested him
Delhi Police chased Bigg Boss fame super thief Bunty to Kanpur and arrested him
social share
google news

दिल्ली : पोलिसांनी ‘सुपर चोर’ बंटी उर्फ ​​देवेंद्र सिंहला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) कानपूरपर्यंत पाठलाग करुन बंटीला बेड्या घातल्या. हे अंतर जवळपास 500 किलोमीटर आहे. अलिकडेच ग्रेटर कैलासमधील दोन घरांमध्ये चोरी झाली होती, यात बंटीचे नाव समोर आले होते. यापूर्वीही बंटीवर देशभरात 500 हून अधिक चोरी केल्याचा आरोप आहे. त्याला अनेक प्रकरणांमध्ये शिक्षाही झाली आहे. (Delhi Police chased Bigg Boss fame super thief Bunty to Kanpur and arrested him)

ADVERTISEMENT

2010 मध्ये, बंटी 3 वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याने सुधारण्याचं ठरवलं होतं. मात्र वर्षभरानंतर तो पुन्हा एका चोरीच्या घटनेच्या सीसीटीव्हीमध्ये दिसला. यानंतर त्याने पुन्हा चोऱ्या करण्यास सुरुवात केली. 2013 मध्ये केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये एका अनिवासी भारतीय व्यावसायिकाच्या घरात चोरी केल्याप्रकरणी तो चर्चेत आला होता. यात बंटीने व्यावसायिकाच्या घरातून 28 लाख रुपये किमतीची एसयूव्ही कार, लॅपटॉप आणि दोन मोबाईल चोरले होते. या हायटेक चोरीच्या 6 दिवसानंतर केरळ पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली होती. या प्रकरणात त्याला 10 वर्षांची शिक्षाही झाली आहे.

डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटी राहणाऱ्या पतीने बायकोचे अश्लील व्हिडीओ केले व्हायरल

बंटीच्या आयुष्यावर चित्रपट अन् बिग बॉसमध्येही एन्ट्री :

दरम्यान, बंटीच्या आयुष्यावर त्यांच्या जीवनावर बॉलिवूड चित्रपटही बनला आहे. ‘ओय लकी! लकी ओये’ असं त्या चित्रपटाचं नावं आहे. या चित्रपटात अभय देओल बंटीच्या भूमिकेत दिसले होते. चित्रपट तज्ञ सांगतात की चित्रपटाचे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांना खरा बंटी उर्फ ​​देवेंद्रच घ्यायचा होता. मात्र त्यावेळी तो तुरुंगात बंद होता. यानंतर सलमान खानच्या अत्यंत लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रम बिग बॉस सीझन-4 मध्ये रियल बंटीची एंट्री झाली. पण त्याने बिग बॉस मध्येच सोडले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बंटीच्या सुपर चोरीचा खास पॅटर्न :

1. बंटी पहाटे 2 ते 6 या वेळेतच सर्व चोरी करायचा.

2. चोरीपूर्वी घरात प्रवेश करण्यासाठी बंटी लांब स्क्रू ड्रायव्हर आणि लिव्हरच्या साहाय्याने दरवाजा किंवा खिडकीची ग्रील उघडतो. याशिवाय त्यांनी कधीही दुसरे साधन वापरले नाही.

ADVERTISEMENT

मुलगी 5 वर्षाची झाली तरी संशय, दोघांनी टेस्ट करताच धक्काच बसला

3. बंटी नेहमी आलिशान कार, दागिने, कटलरी, परदेशी घड्याळे आणि प्राचीन फर्निचर यांसारख्या महागड्या वस्तूंवरच हात साफ करायचा. चोरीच्या वस्तूंमध्ये कधीही क्षुल्लक गोष्टींचा समावेश केला नाही. बंटीचा रेकॉर्ड बघितला तर असे वाटले की जणू तो सामान्य गोष्टींची चोरी करणे त्याच्या अभिमानाच्या विरुद्ध मानतो.

ADVERTISEMENT

4. आजपर्यंत बंटीने चोरी करण्यापूर्वी कोणत्याही कारचे लॉक तोडले नाही. कार उघडण्यासाठी तो नेहमी कार मालकाच्या घरातून चोरलेली चावी वापरत असे.

5. बंटीबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट होती. चोरी करण्यासाठी तो नेहमी कारमधून जायचा आणि जुनी गाडी जागेवरच सोडून तो घटनास्थळी सापडलेल्या नवीन कारमध्ये फरार व्हायचा.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT