फेसबुकवर मैत्री केली, हॉटेलवर बोलावलं अन् गॅंगरेप करून…महिलेसोबत घडली भयंकर घटना

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

delhi women murder after gang rape in karnal hariyana crime story
delhi women murder after gang rape in karnal hariyana crime story
social share
google news

हरियाणाच्या करनालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 33 वर्षीय महिलेवर गॅंगरेप करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. या महिलेचा मृतदेह पोलिसांना एका हॉटेलमध्ये सापडला आहे. पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून महिलेच्या नेमकी हत्या कशी झाली याची माहिती समोर येणार आहे. यासह पोलिसांनी महिलेसोबत हॉटेलमध्ये कोण थांबल होतं, त्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. (delhi women murder after gang rape in karnal hariyana crime story)

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय महिलेचा मृतदेह ज्या हॉटेलच्या रूममध्ये सापडला होता. तो रूम एका 30 वर्षीय मनोज नावाच्या मुलाच्या नावावर होता. या मनोजबाबत कसून तपास केला असता अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मनोज हा सोनीपत गावच्या कामीचा रहिवाशी आहे. तर मृत महिला ही दिल्लीची रहिवाशी आहे. या दोघांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या नात्यातील विश्वासातून ती एकटी मनोजला भेटायला हॉटेलवर आली होती. मात्र तिचा दुदैवी मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा : पुण्यात खळबळ! आधी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या

माहितीनुसार 33 वर्षीय मृत महिलेला मनोज सोबत लग्न करायचे होते. मात्र मनोजने लग्न करण्यास नकार दिला होता. कारण महिलेचे आधीच एक लग्न झाले होते. तसेच मृत महिला ही लग्नासाठी सतत दबाव टाकत होती. त्यामुळे तिचा काटा काढण्यासाठी मनोजने महिलेला हॉटेलवर भेटायला बोलावले होते. यानंतर महिलेवर मनोजने आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर गॅगरेप करून तिची हत्या केली.

हे वाचलं का?

या घटनेची माहिती हॉटेल स्टाफने पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला होता.यावेळी महिलेच्या गळ्यावर काही निषाण सापडले आहेत. त्यामुळे तिची गळा दाबून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून मृत्यूचे मागचं कारण समोर येणार आहे.

दरम्यान बकौल पोलीस ठाण्यात आता मृत महिलेच्या बहिणीने तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Crime: ‘माझी आई मरून जाईल’, डॉक्टरला घरी बोलवलं अन् तरुणी झाली नग्न; नंतर…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT