Dombivali : डोंबिवली हादरलं! ट्यूशनला घरी आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपी गजाआड
Dombivali Crime News : बदलापूरच्या बलात्काराच्या घटनेनंतर डोंबिवलीत एका आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना

पीडित मुलीने कुटुंबीयांना सांगितला घडलेला धक्कादायक प्रकार

पोलिसांनी लागलीच आरोपी वैभव सिंगच्या मुसक्या आवळल्या
Dombivali Crime News : बदलापूरच्या बलात्काराच्या घटनेनंतर डोंबिवलीत एका आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गून्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. वैभव जितेंद्र सिंग ( १९ ) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत पीडित मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहत आहे. आरोपी वैभव सिंगची बहीण ट्यूशन टीचर आहे. परिसरातील मुलं त्याच्या घरी ट्यूशन घेण्यासाठी येत होते. 15 जानेवारी रात्री आठ वाजता पीडित मुलगी सिंगच्या घरी ट्युशनसाठी गेली होती. त्यावेळी त्याच्या घरी ट्यूशन घेणारी नव्हती. तेव्हा आरोपी वैभवने पीडीत मुलीचा हात पकडून तिला बेडरूममध्ये घेवून गेला आणि बेडरूमची दरवाजाची कड़ी लावून तिच्यासोबत जबरदस्तीने बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलगी आपल्या घरी गेली आणि घडलेल्या प्रकार कुटुंबियांना सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी वैभव सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी तातडीनं आरोपीला अटक करून तपास सुरु केला.
हे ही वाचा >> Kareena Kapoor Video : घाबरलेली करीना आली, सगळ्यात आधी कुणाशी बोलली, व्हिडीओमध्ये नेमकं काय?
"मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल 15 जानेवारीला रात्री 8 वाजता दोन विद्यार्थीनी ट्यूशनसाठी गेल्या होत्या. ट्यूशन टीचर क्लासमध्ये नव्हती. पण तिचा भाऊ जो गुन्ह्यात आरोपी आहे, तो घरी होता. त्याने परिस्थितीचा फायदा उचलून एका मुलीला बेडरूममध्ये घेऊन गेला. तिच्यावर त्याने लैंगिक अत्याचार केला. त्या पीडित मुलीने घरी आल्यावर या प्रकाराबाबत तिच्या आईला सांगितलं. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आणि पोलीस स्टेशनमध्ये याची नोंद झाली. वैभव जितेंद्र सिंग असं आरोपीचं नाव असून आम्ही त्याला लगेच अटक केली आहे", अशी माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली आहे.