Beef Carrying Man Assaulted : 'गोमांस आणतो काय...' मांस पाहून वृद्धाला ट्रेनमध्येच भीषण मारहाण; Video व्हायरल
Beef Carrying Man Assaulted : खरं तर या घटनेत वृद्ध त्याच्यासोबत दोन बरण्या घेऊन जात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या बरण्यांमध्ये गोमांस असल्याचा दावा तरूणांनी केला होता. त्यामुळे गोमांस बाळगल्याच्या संशयातून या तरूणांच्या टोळक्याने वृद्धाला मारहाण केल्याची घटना घडली होती.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गोमांस बाळगल्याचा संशयातून वृद्धाला मारहाण
तरुणांच्या टोळक्याने शिवीगाळ करून मारहाण केली
या प्रकरणी 5 तरूणांवर एफआयआर दाखल
Beef Carrying Man Assaulted : देशात बीफ बाळगळ्या प्रकरणी जमावाने मारहाण आणि हत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. आता अशीच एक घटना महाराष्ट्रातून समोर आली आहे. धुळ्यातील (Dhule) एका वृद्ध व्यक्तीला ट्रेनमध्ये (Elder man) जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.अश्रफ अली सय्यद हुसैन असे 72 वर्षीय वृद्धाचे नाव आहे. गोमांस (Beef carrying) बाळगल्याच्या संशयातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Video Viral) सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर संबधित तरूणांवर एफआयआर दाखल झाला असून त्यांचा शोध पोलिसांनी सूरू केला आहे. (elderly 72 year old man assaulted inside train group of youth beaten and accuse him of carrying beef shocking story)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, मुळचे धुळ्याचे रहिवासी असलेले 72 वर्षीय अश्रफ अली सय्यद हूसेन हे आपल्या मुलीला भेटण्यासाठी धुळे सीएसएमटी एक्सप्रेसने कल्याणला निघाले होते. या दरम्यान ट्रेनमधल्या काही तरूणांसोबत त्याचा वाद झाला होता. हा वाद पुढे जाऊन इतका टोकाला पोहोचला की तरूणांनी वृद्धाला शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणी दरम्यान अनेक सहप्रवाशांनी हा व्हिडिओ शुट करून सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
हे ही वाचा : सप्टेंबरपासून 'हे' नियम बदलणार, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम?
खरं तर या घटनेत वृद्ध त्याच्यासोबत दोन बरण्या घेऊन जात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या बरण्यांमध्ये गोमांस असल्याचा दावा तरूणांनी केला होता. त्यामुळे गोमांस बाळगल्याच्या संशयातून या तरूणांच्या टोळक्याने वृद्धाला मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीआरपीने या वृद्धाचा शोध घेतला आणि त्याच्या घरी जाऊन जबाब नोंदवून घेतला. आणि त्या जबाबा आधारे ठाणे जीआरपी पोलिसांनी 5 हून अधिक तरूणांविरोधात कलम 189(2),191(2), 190, 126(2), 115आणि 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
धुळे एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ही घटना घडली आहे. वृद्ध आणि तरूणांमध्ये सुरूवातीला सीटवरून भांडण झाली होती. त्यानंतर वृद्ध प्रवाशावर गोमांस घेऊन प्रवास केल्याप्रकरणी आरोप करून मारहाण करण्यात आली होती. या घटनेतील संशयित आरोपींना धुळ्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्याला ठाण्यात आणण्यासाठी पथक रवाना झाले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओ तपासून आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : आजच भरून घ्या अर्ज..., 3000 मिळवण्यासाठी उरले शेवटचे काही तास!
तसेच मी ठीक आहे. लोकांना माझ्याबद्दल इतकी काळजी आहे याबद्दल मी आभारी आहे. मी ठीक आहे आणि कोणीही चुकीचे पाऊल उचलू नये. अल्लाहने मला सुरक्षित ठेवले आहे, अशी प्रतिक्रिया हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अश्रफ अली सय्यद हूसेन यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
विशेष म्हणजे या घटनेतील अश्रफ अली सय्यद हूसेन हे सुखरूप आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर कुणीही विश्वास ठेऊ नका. तसेच संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नका, असे आवाहन मुंबई लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.
ADVERTISEMENT