Dombivli: लोढा संकुलातील टॉवरला भीषण आग, सहाव्या मजल्यापर्यंत आगडोंब

मुंबई तक

ADVERTISEMENT

Fierce fire breaks out at Lodha building in Dombivli fire guts Loha gallery from 5th to 6th floor
Fierce fire breaks out at Lodha building in Dombivli fire guts Loha gallery from 5th to 6th floor
social share
google news

Dombivli Fire: डोंबिवली खोणी पलावात एस्ट्रेला टॉवरला भीषण आग लागून पाच ते सहा गॅलरी जळून खाक झाल्या आहेत. ही आग लागल्यानंतर अग्निशमन दलाला (fire brigade) पाचारण करण्यात आल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र उंच इमारतीला  आग लागल्यामुळे पाण्याचा फवार उंच पर्यंत पोहचत नव्हता. त्यामुळे ही आग आणखी पसरत गेली आहे. या आगीत पाच ते सहा मजल्यापर्यंत आग पसरून गॅलरी जळून खाक झाल्या आहेत.

ADVERTISEMENT

आग पसरत गेली

डोंबिवली खोणी पलावात एस्ट्रेला टॉवरला भीषण आग लागली असून लोढा फेज टूमधील इमारतील आग लागली आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा अग्निशमनकडून प्रयत्न असून ही इमारतीमध्ये आणखी किती पसरली आहे त्याची अजून माहिती मिळू शकली नाही.

हे ही वाचा >> Milind Deora : काँग्रेसमध्ये होणार मोठा भूकंप, मुंबईचा ‘हा’ नेता शिंदे गटात करणार प्रवेश?

पाणी पोहचले नाही

इमारतीमध्ये आग लागल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न झाले असले तरी पाण्याचा फवार आगीपर्यंत पोहचत नसल्याने आग पसरत गेली होती. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून इमारतीचे मात्र मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही आग कशामुळे लागली त्याचे नेमके कारण अजून समजू शकले नसले तरी. पोलिसांसह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार प्रयत्न करून आग अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न चालू केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जीवित हानी नाही

डोंबिवलीतील इमारतीला आग लागल्याचे समजताच नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत् केले जात होते, मात्र उंच इमारतीवर पाण्याचा फवारा पोहचत नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवताना प्रचंड प्रयत्न करावे लागत होते. ही आग लागल्यानंतर जीवित हानी झाली का त्याचीही चौकशी करण्यात आली. मात्र प्राथमिक माहितीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचेही सांगितले.

हे ही वाचा >> CM शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल, ‘बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण हे ‘घरगडी’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT