"ती भांडायची, सर्कीटसारखी वागायची...", पत्नीला मारून सुटकेसमध्ये टाकणाऱ्या आरोपीचे वडील काय म्हणाले?
Bengaluru suitcase murder case : मुलाचे वडील म्हणाले, "माझा मुलगा राकेश म्हणाला माझ्या मुलाचा मला फोन आला. ती माझ्यासोबत खूप भांडत होती, म्हणून मी असं केल्याचं त्यानं सांगितलं. मुलीची आई माझी बहीणच आहे, मुलगी माझी सख्खी भाची आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बंगळुरूमध्ये राहत असलेल्या दोघांमध्ये रोज वाद व्हायचे

आरोपी मुलाच्या पतीने सांगितल्या धक्कादायक गोष्टी

"पत्नीला मारल्यानंतर त्याने मला फोन करुन सांगितलं..."
Gauri Khedekar Case : बंगळुरूमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. कामासाठी बंगळुरूमध्ये महाराष्ट्रातील जोडपं बंगळुरूमध्ये राहत होतं. राकेश आणि गौरी या दोघांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर आता राकेशने आपली पत्नी गौरीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं दोन्ही कुटुंब हादरले असून, या प्रकरणात आता आणखी धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
आरोपीला साताऱ्यातून अटक
आरोपी राकेशला काल रात्री सातारा पोलिसांनी अटक केली आहे. सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळामध्ये एका चारचाकी चालकाला रस्त्यावर चक्कर येत असल्याचं दिसून आलं. लोकांनी स्थानिक पोलिसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत राकेश बेशुद्धावस्थेत होता. पोलिसांना तोपर्यंतच बंगळुरू पोलिसांकडून त्याच्याबद्दल माहिती मिळाली होती. त्याआधारेच त्याची ओळख पटली होती.
आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न
राकेशने झुरळ मारण्याचं औषध किंवा फिनायल पिल्याचा माहिती ससून रुग्णालयाकडून मिळाली आहे. राकेशने विषारी पदार्थ प्राशन केलेलं होतं, त्यामुळे त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, बंगळुरू पोलिस पुण्यात पोहोचले आहेत.
मुलाच्या वडिलांनी सगळं सांगितलं...
मुलाचे वडील म्हणाले, "माझा मुलगा राकेश म्हणाला माझ्या मुलाचा मला फोन आला. ती माझ्यासोबत खूप भांडत होती, म्हणून मी असं केल्याचं त्यानं सांगितलं. मुलीची आई माझी बहीणच आहे, मुलगी माझी सख्खी भाची आहे. त्यांनी खूप त्रास दिला. आमच्या आईलाही खूप त्रास दिला. राकेशने विषाची बाटली घेतली होती, तो म्हणाला सगळ्यांना सांगून द्या की मी असं असं केलं आहे. मी सुद्धा आता स्वत:ला संपवणार आहे. त्याला मी म्हणालो, आपण पोलिसांना सगळं सांगू. तो यायच्या आधीच मी जोगेश्वरी पोलिसांना जाऊन सगळं सांगितलं. जिथं राहत होता, तिथला नंबर मुलानेच दिला. पत्ताही त्यानेच दिला. ती रोज भांडण करायची, सर्कीटसारखं वागायची, भावालाही मारलं होतं. आम्ही हे लग्न होऊ नये म्हणून आम्ही चार वर्ष थांबलेलो होतो. पण ते दोघं ऐकत नव्हते म्हणून आम्ही लग्न लावून दिलं होतं. "
बंगळुरूच्या हुलीमायू पोलीस स्टेशन परिसरात ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दोड्डकम्मनहल्ली शहरातील एका फ्लॅटमध्ये एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आला अशी माहिती पोलिसांनी दिली होती. मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेसमध्ये भरले आणि त्यानंतर फ्लॅटला कुलूप लावून पुण्याला पळून गेला असं पोलिसांनी सांगितलं होतं. पोलीस उपायुक्त सारा फातिमा यांनी याबाबत माहिती दिली.