IAS Pooja Khedkar: बंदुकीचा धाक दाखवत शेतकऱ्यांना दमदाटी, पूजा यांच्या आईचा 'मुळशी पॅटर्न'!Video व्हायरल

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पूजा खेडकरांच्या आईच्या 'त्या' वादग्रस्त व्हिडीओत नेमकं काय? 

point

IAS पूजा खेडकर यांचे वादग्रस्त प्रकरण काय?

point

IAS पूजा खेडकर यांचे वादग्रस्त प्रकरण काय?

IAS Pooja Khedkar's Mother Viral Video : महाराष्ट्र केडरची प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर या सध्या चर्चेत आहे. प्रोबेशन काळात नियमबाह्या मागण्या केल्यामुळे पूजा खेडकर वादात सापडल्या आहेत. पण यानंतर आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी अपंगत्व आणि नॉन क्रिमिलियरचे बनावट प्रमाणपत्र दाखवल्याचा आरोप आहे. त्यांनी 2021 मध्ये परीक्षा दिली होती आणि त्यांचा अखिल भारतीय रँक 821 होता. पण आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप आहे, त्यामुळे आता त्यांची वाशिमला बदली करण्यात आली आहे. अशात त्यांच्या आईचा वादग्रस्त जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. (ias probationer pooja khedkar mother manorama controversial video viral of Farmers treated with guns)

आधी वडिलांच्या संपत्तीमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं होतं. पण, आज आईच्या व्हायरल व्हिडीओमुळे प्रकरणात नवं ट्वीस्ट आलं आहे. IAS प्रोबेशनर डॉ. पूजा खेडकर यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी, दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

हेही वाचा : Vidhan Parishad Election 2024: 11 जागा, 12 उमेदवार... विधान परिषद निवडणुकीत आज कोणाचा होणार गेम? 

पूजा खेडकरांच्या आईच्या 'त्या' वादग्रस्त व्हिडीओत नेमकं काय? 

पूजा खेडकर यांच्या आईचा धमकी देतानाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडीओमध्ये त्या शेतकऱ्यांना बंदुक घेऊन धमकी देताना दिसत आहेत. त्यांचा हा मुळशी पॅटर्न आता पूजा यांना भारी पडणार का? अशी चर्चा सुरू आहे. पूजा खेडकर यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर बंदुक घेऊन मुळशीतल्या शेतकऱ्यांना दमदाटी करत आहेत.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुळशी तालुक्यातील धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती, ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याला जेव्हा शेजारच्या जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध केला, तेव्हा मनोरमा खेडकरांनी बंदूक घेऊन त्यांना दमदाटी केली, शेतकऱ्यांना धमकावले. या शेतकऱ्यांनी जेव्हा पौड पोलीस स्थानकात याबाबत तक्रार केली तेव्हा त्यांना वरून दबाव आला अशी माहिती मिळाली आहे.

हेही वाचा : Mumbai Local Train : मुंबईत मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत!

IAS पूजा खेडकर यांचे वादग्रस्त प्रकरण काय?

महाराष्ट्र केडरच्या 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या त्यांच्या अतिरिक्त मागण्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत. त्यांची पुण्यातून वाशीम येथे बदली करण्यात आली आहे. नवीन अहवालानुसार, पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड आणि मेंटल इलनेस असल्याची सर्टिफिकेट सादर करून UPSC ची परीक्षा दिली होती. त्याआधारे विशेष सवलत मिळवून त्या आयएएस झाल्या. त्यांना जर ही सवलत मिळाली नसती तर जितके गुण त्यांना मिळाले आहेत त्यात त्यांना IAS पद मिळणे अशक्य होते. 

ADVERTISEMENT

त्याचबरोबर निवड झाल्यानंतर, पूजा खेडकर यांची वैद्यकीय तपासणी होणार होती, परंतु त्यांनी टाळाटाळ केली. वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांनी सहा वेळा वैद्यकीय चाचण्या करण्यास नकार दिला. तसेच, बाहेरच्या वैद्यकीय एजन्सीकडून एमआरआय अहवाल सादर करणे निवडले, जे UPSC ने स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, नंतर यूपीएससीने हा अहवाल स्वीकारला. यामुळे सरकारने याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Vidhan Parishad Election: कोणासोबत होणार दगाफटका? आमदारांची मतं कोणाला बनवणारं आमदार?

 

IAS पूजा खेडकर यांच्या वडीलांचे नाव दिलीप खेडकर आहे. ते माजी सनदी अधिकारी होते. तर, आई डॉ. मनोरमा खेडकर या देखील अहमदनगर जिल्हात पाथर्डी तालुक्यातील भालगावच्या लोकनियुक्त माजी सरपंच होत्या. त्याचबरोबर मनोरमा खेडकर यांचे वडील जगन्नाथ बुधवंत हे देखील माजी सनदी अधिकारी होते. त्यांची कारकीर्द देखील वादग्रस्त होती. त्यांचे निलंबनही झाले होते.  

    follow whatsapp

    ADVERTISEMENT