Crime: डोंबिवलीत जावयाने सासूचं घरातून केलं अपहरण, रुमवर नेलं अन्…
Mother-in-Law Kidnap: पती बरोबरच्या सततच्या भांडणाला कंटाळून माहेरी आलेल्या पुन्हा सासरी पाठविण्यासाठी सासूने नकार दिल्याने जावयाने सासूचंच अपहरण केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीमध्ये घडली आहे.
ADVERTISEMENT
Dombivli Crime: डोंबिवली: पतीबरोबरच्या (Husband) सततच्या भांडणाला कंटाळून पत्नी (wife) तळोजा (Taloja) येथून आपल्या कल्याणमधील माहेरी असलेल्या घरी रागात निघून आली. यावेळी तिने आपल्या मुलालाही सोबत आणलं होतं. पण यानंतर महिलेच्या पतीने जे कृत्य केलं त्याने महिलेसह तिचे माहेरकडील मंडळी देखील हादरून गेले आहेत. (in dombivli son in law kidnapped mother in law from home angry with wife going to her maternal house did strange work)
ADVERTISEMENT
नेमकं काय घडलं?
महिला आपल्या मुलासह माहेरी आल्यानंतर दोन दिवसांनी पती आपल्या मित्राला घेऊन कल्याण पूर्वेत पत्नी राहत असलेल्या सासूच्या (Mother-in-Law) घरी आला. पत्नी आणि मुलाला घेऊन जाण्यासाठी यावेळी तो आला होता. पण यावेळी सासूने मुलीला सासरी पाठविण्यास नकार दिला.
त्यानंतर जावयाने (Son-in-law) सासूला सांगितलं की, आपण या प्रकरणात पोलिसात जाऊ. यावेळी पोलीस ठाण्यात जायचे आहे असे खोटे सांगून जावयाने चक्क सासूचेच अपहरण (kidnap) केलं. सासूचं अपहरण करून जावयाने तिला थेट तळोजा येथे नेऊन कोंडून ठेवलं आणि तिला बेदम मारहाण केली असल्याचं आता समोर आलं आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Crime: वासनांध पत्नी, प्रियकर अन् पतीच्याच पैशाने… हादरवून टाकणारी घटना
मिळालेल्या माहितीनुसार, भावेश मढवी हा तळोजा जवळील एका गावात राहतो. त्याचे लग्न कल्याण पूर्वेत राहत असलेल्या दीक्षिता खोकरे हिच्या बरोबर झाला आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे. पण काही महिन्यांपासून दीक्षिता आणि पती भावेश यांच्यात कौटुंबिक कारणातून सातत्याने भांडणे होत होती. याच भांडणाला कंटाळून ती कल्याणमधील आपल्या आईच्या घरी आली होती.
यावेळी पत्नी व मुलाला पुन्हा आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी जावई भावेश आणि त्याचा मित्र सूरज म्हात्रे वाहन घेऊन कल्याण पूर्वेतील अमरदीप वसाहत भागात आले. घरात आल्यानंतर भावेशने पत्नी कुठे आणि मुलाला कोणाला विकले का? असे रागाच्या भरात प्रश्न केले. तुम्ही माझ्या पत्नी, मुलाचे काही तरी वाईट केले आहे असा आरोप करत भावेशने सासू दीपाली हिला थेट चाकूचा धाक दाखविला. आम्ही तुम्हाला आता पोलीस ठाण्यात नेतो असं म्हणत भावेश आणि सूरजने सासूला जबरदस्तीने स्वत:च्या गाडीत बसवलं. ज्यानंतर त्याने सासूला स्वत:च्या तळोजा येथील घरी नेऊन डांबून ठेवले. तेथे त्याने तिला लोखंडी सळई, कात्रीने मारहाणही केली.
ADVERTISEMENT
दरम्यान, आई कुठे गेली म्हणून दीक्षिताने आईचा शोध सुरू केला. त्याच दरम्यान, तिला पती भावेशचा फोन आला. ‘आई माझ्या ताब्यात आहे. तू मुलाला माझ्या ताब्यात दे’, अशी धमकी भावेशने पत्नीला दिली. दीक्षिताने हा प्रकार कुटुंबातील इतर सदस्यांना सांगितला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Gadchiroli Crime : 5 जणांच्या हत्याकांडात सूनेच्या मित्राची एन्ट्री, तपासात काय आढळलं?
त्यानंतर कुटुंबीयांनी थेट मानपाडा पोलिसाता धाव घेतली. ज्यानंतर पोलिसांना घेऊन ते थेट तळोजा येथे पोहचले. तेथे दीपाली जखमी अवस्थेत आढळून आली. यावेळी पोलिसांनी सासू दीपालीची भावेशच्या ताब्यातून सुटका केली. तसेच भावेश आणि सूरजला तात्काळ अटकही केली.
आता या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपी जावयाविरोधात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT