Mira Road Murder : रेशन दुकानात भेट अन् क्रूर शेवट! झोप उडवणाऱ्या हत्येची Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mira road Murder, Live in Partner murder and chopped : the deceased Saraswati had met Manoj in the year 2014.
Mira road Murder, Live in Partner murder and chopped : the deceased Saraswati had met Manoj in the year 2014.
social share
google news

Who is Manoj sane : मुंबई उपनगरातील मीरा रोड भागात राहणाऱ्या मनोज साने नावाच्या व्यक्तीने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केली. त्याने लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे अनेक तुकडे केले. दुर्गंधी येऊ नये म्हणून तो ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवत असे. या हृदयद्रावक आणि क्रौर्याच्या सीमा पार करणाऱ्या घटनेने दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पोलीस तपासात मयत सरस्वती हिची मनोजशी 2014 मध्ये भेट झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आधी सरस्वती अनाथ असल्याचे सांगितले, पण नंतर तिच्या बहिणींबद्दल माहिती मिळाली. (What is Mira Road murder case?)

ADVERTISEMENT

पोलिसांनी सांगितले की, “पीडिता पूर्वी बोरिवलीच्या पश्चिम उपनगरात एका आश्रमात राहत होती. मनोज साने ज्या रेशन दुकानात काम करायचा तिथे ती अनेकदा जायची. 2014 साली मनोज साने आणि सरस्वतीची याच रेशन दुकानावर भेट झाली. तिथून दोघांमधील जवळीक वाढत गेली. त्यानंतर 2016 पासून दोघे एकत्र राहू लागले. तीन वर्षांपूर्वी ते मीरा रोडवरील फ्लॅटमध्ये राहायला आले होते.

मीरा रोड येथील नयानगर पोलीस अधिकाऱ्यांनी सरस्वती वैद्यच्या कुटुंबाचा शोध घेतला. सरस्वतीला तीन बहिणी असून, सर्व बहिणी नया नगर पोलीस ठाण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सरस्वतीच्या हत्येचा बहिणींना धक्का बसला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सरस्वतीचा मृतदेह मनोजने घातला कुत्र्यांना

मनोज साने यांच्या फ्लॅटमधून शरीराचे कापलेले आणि उकडलेले अवयव सापडले आहेत. शरीराचे अवयव मिक्सरमध्ये बारीक करून, तर काही भाग प्रेशर कुकरमध्ये शिजवण्यात आले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे प्रकरण दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणासारखे आहे.

संबंधित वृत्त >> Mira Road Murder : मनोज साने आणि सरस्वती वैद्यने केले होते लग्न?

मनोजच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, मनोज गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांना खाऊ घालत होता. त्याने यापूर्वी कधीही कुत्र्यांना खायला दिले नाही. त्यामुळे मनोज कुत्र्यांना सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे खायला देत होता, ही बाब समोर आली.

ADVERTISEMENT

तीन वर्षांपासून होते लिव्ह इनमध्ये

पोलिसांचे म्हणणे आहे की, 36 वर्षीय सरस्वती वैद्य रेशन दुकानावर काम करणाऱ्या मनोज सानेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मीरा रोड पूर्व येथील गीता आकाशदीप इमारतीच्या सातव्या मजल्यावर हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून राहत होते. मनोजच्या शेजाऱ्याला बुधवारी साने यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती. शेजाऱ्याने मनोजला वास कुठून येतोय, असे विचारले असता मनोज घाबरला होता. मनोज काळ्या रंगाची सॅक घेऊन निघून गेला होता. त्यामुळे लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> “2014 नंतर भाजपसोबत युतीला माझा विरोध होता”, संजय राऊतांचा ‘राजकीय बॉम्ब’

पोलिसांचे म्हणणे आहे की, शेजाऱ्यांनी सांगितले की, मनोज साने त्याच्या फ्लॅटमधून काळ्या रंगाची सॅक घेऊन बाहेर आला. त्याने लोकांना सांगितले की तो रात्री 10.30 पर्यंत परत येईल. शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस मनोजच्या फ्लॅटवर पोहोचले आणि दरवाजा ठोठावला. बराच वेळ आतून काहीच उत्तर न आल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला.

कुकरमध्ये मृतदेहाचे तुकडे, अर्धी जळालेली हाडे, रक्ताने भरलेली बादली आणि टब

मनोजच्या फ्लॅटच्या बेडरूममध्ये पोलिसांना प्लास्टिकची पिशव्या आणि रक्ताने माखलेले करवत सापडले. यादरम्यान पोलीस स्वयंपाकघरात शिरले तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. पोलिसांना स्वयंपाकघरात ठेवलेला प्रेशर कुकर आणि काही भांड्यांमध्ये मानवी मांस उकडलेले आढळले. त्या महिलेचे केस जमिनीवर पडलेले आढळले. याशिवाय अर्धी जळालेली हाडे आणि मांस बादल्या आणि टबमध्ये पडून होते.

4 जून रोजी केली हत्या, मृतदेहाची हळूहळू लावत होता विल्हेवाट

प्राथमिक तपासाचा हवाला देत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मनोज सानेने 4 जून रोजी वैद्यची हत्या केली असावी आणि मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होता. लिव्ह-इन पार्टनरने आत्महत्या केल्याचा दावा करून साने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र संपूर्ण चौकशीनंतर सत्य बाहेर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >> Mira Road Murder: ‘मी HIV पॉझिटिव्ह, सरस्वतीसोबत…’ मनोज सानेचा दावा

मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांचे डीसीपी झोन I जयंत बजबळे यांनी सांगितले की, मृतदेहाचे अवयव फॉरेन्सिक तपासणीसाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. नया नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मनोज साने यांच्याविरुद्ध कलम 302 (खून) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयाने मनोज सानेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

“उंदीर सडल्याने दुर्गंधी येते असावी”

मनोजच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, फ्लॅटमधून येणारा दुर्गंध उंदर सडल्यामुळे येत असावा असे त्यांना प्रथम वाटले, पण पोलिसांनी तपास केला तेव्हा सगळेच हादरले. दुसऱ्या एका शेजाऱ्याने सांगितले की, आरोपीने त्याच्या फ्लॅटमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी रूम फ्रेशनरचा वापर केला होता.

हेही वाचा >> भाजप-शिवसेना युतीत ‘ठिणगी’! श्रीकांत शिंदे म्हणाले, “खासदारकीचा राजीनामा देतो”

दुसरीकडे, परिसरातील आणखी एका व्यक्तीने सांगितले की, आतापर्यंत आम्ही टीव्ही मालिकांमध्ये अशा घटना पाहिल्या आहेत, परंतु हा प्रकार आमच्याच परिसरात घडला आहे.

मनोज आणि सरस्वती कोणाशी जास्त बोलत नसल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. दोघांचे भांडण कधी ऐकले नाही. गेल्या काही दिवसांपासून मनोज साने भटक्या कुत्र्यांना काही तरी खाऊ घालत होते, मात्र यापूर्वी कधीही कुत्र्यांना खायला घालताना पाहिले नसल्याचे एका शेजाऱ्याने सांगितले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT