Crime : एक महिन्याच्या बाळाचं अपहरण, हजारो रिक्षा चालकांची चौकशी करत पोलिसांनी बाळ विकण्यापूर्वीच...

मुंबई तक

2 मार्च रोजी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ब्लँकेट विकणाऱ्या जोडप्यानं वनराई पोलिस ठाण्यात त्यांचं 38 दिवसांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील गोरेगावमधून बाळाचं अपहरण

point

ब्लँकेट विकणाऱ्या जोडप्याचं 1 महिन्याचं बाळ

point

पोलिसांनी हजारो रिक्षा चालकांची केली चौकशी

Mumbai Goregaon : मुंबईतील गोरेगावमध्ये पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून एका 38 दिवसांच्या मुलाला सुखरूप सोडवलं. गोरेगाव (पूर्व) परिसरातून चारजणांच्या टोळीने एका बाळाला विकण्याच्या उद्देशानं पळवून नेलं होतं. या प्रकरणात टोळीतील 2 महिलांसह चार लोकांना अटक करण्यात आली आहे. 

2 मार्च रोजी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ब्लँकेट विकणाऱ्या जोडप्यानं वनराई पोलिस ठाण्यात त्यांचं 38 दिवसांचा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पालघरला लागून असलेल्या वसईला जाण्यासाठी या जोडप्याची ट्रेन चुकली होती आणि ते रस्त्याच्या कडेला झोपले होते आणि तिथून मुलगा बेपत्ता झाला.

हे ही वाचा >> विधान परिषद निवडणूक: 'या' नावांची जोरदार चर्चा, पण भाजप वापरणार धक्कातंत्र?

फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ते म्हणाले की, तपासादरम्यान अपहरणाचे पैलू समोर आले, त्यानंतर गुन्हेगारांना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली. आरोपींनी अशाच वाहनांतून प्रवास केल्याची माहिती मिळाल्यानं पोलिसांनी सुमारे 11,000 ऑटो-रिक्षा तपासल्या आणि चालकांची चौकशी केली. जेव्हा त्यांनी अपहरणाशी संबंधित एका व्यक्तीला चौकशीदरम्यान शोधलं, तेव्हा पोलिसांना या तपासात यश आलं आणि मालाड (पश्चिम)मध्ये आरोपीला पकडलं.

हे ही वाचा >> Pune Crime : लघवी करण्याच्या कारणावरुन वाद झाला, टोळक्याचा जोडप्यावर कोयत्यानं हल्ला

दरम्यान, यानंतर आरोपीने अपहरण झालेल्या मुलाची माहिती दिली, त्यामुळे त्याला वाचवता आलं. त्यानंतर इतर आरोपींनाही अटक करण्यात आली. अपहरण झालेल्या मुलाची विक्री करण्याचा त्यांचा डाव असल्याचं टोळीतल्या सदस्यांनी पोलिसांना सांगितलं. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.


 

हे वाचलं का?

    follow whatsapp