Satish Bhosle: 'खोक्या'ला पकडण्यासाठी जाळ टाकलाय, पोलिसांचा 'हा' प्लॅन पाहिला का?

मुंबई तक

Satish alias Khokya Bhosale: सतीश उर्फ खोक्या भोसले हा काही गुन्ह्यामध्ये आरोपी असून सध्या फरार आहे. त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी एका नवा प्लॅन तयार केला आहे.

ADVERTISEMENT

'खोक्या'ला पकडण्यासाठी जाळ टाकलाय
'खोक्या'ला पकडण्यासाठी जाळ टाकलाय
social share
google news

बातम्या हायलाइट

point

खोक्या अजूनही पोलिसांना का सापडत नाही?

point

खोक्याच्या अटकेसाठी दोन पथकं रवाना

point

खोक्याची संपत्ती जप्त करण्यास पोलिसांकडून सुरुवात

Satish Bhosle Beed: बीड: भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या विरोधात शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दोन वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आहेत. या गुन्ह्यातील आरोपी असलेला 'खोक्या' हा गेल्या सहा दिवसापासून फरारच आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना देखील करण्यात आली आहेत. मात्र, आता खोक्याची पूर्ण नाकेबंदी करण्यासाठी पोलिसांनी त्याची थेट प्रॉपर्टी जप्त करण्यास सुरुवात केली आहे. 

'खोक्या'ला पकडण्यासाठी पोलिसांचा 'हा' प्लॅन

सतीश भोसले प्रत्येक वेळी लोकेशन बदलत असल्यामुळे पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अपयश येत आहे. पण त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. नुकतीच पोलिसांनी त्यांची फोर्ड कंपनीची गाडी जप्त केली आहे. रात्री अकराच्या दरम्यान शिरूर कासार तालुक्यातील रायमोह परिसरांमधून त्याची कार जप्त करण्यात आली आहे.

हे ही वाचा>> Satish Bhosle: वृद्धाला अर्धनग्न करुन बॅटने मारलं, दात पाडले... आमदार सुरेश धसांचा तो 'शागीर्द' कोण?

आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी खोक्याची प्रॉपर्टी जप्त करण्याचे पत्र पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्याकडे दिलं आहे.

सतीश भोसले याच्याकडे कोट्यावधी रुपयांची प्रॉपर्टी तसेच आलिशान गाड्या आहेत. याबरोबरच तो पत्ते खेळण्याचा शौकीन होता. त्यातून त्याने लाखो रुपयांची माया गोळा केल्याची माहिती आहे.

अहिल्यानगर, आष्टी, पुणे, बीड जिल्ह्यांमध्ये तो पत्ते खेळायचा. तसेच राज्यात होत असलेल्या चोऱ्या, चोरी झालेले सोने यातून त्याने माया गोळा केली असल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. यात आमदार सुरेश धस यांचा देखील समावेश असून त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राम खाडे यांनी केली आहे.

खोक्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज

बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले आणि त्याच्या इतर 6 साथीदारांच्या विरोधात ढाकणे कुटुंबीयांना अमानुष मारहाण प्रकरणी आणि कैलास वाघ यांना बॅटने अमानुष मारहाण प्रकरणी वेगवेगळ्या स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत.

हे ही वाचा>> 'CM फडणवीसांनी मुंडेंना स्वत: जाऊन सांगितलं आता राजीनामा द्या', सुरेश धसांनीच सांगितली Inside स्टोरी

एकीकडे फरार असलेला सतीश भोसले पोलिसांना अद्यापही सापडत नाही. पण दुसरीकडे खोक्याने अटकपूर्वजामिनी साठी काल दुपारनंतर बीड न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. त्याने अटकपूर्व जामिनीसाठी बीड न्यायालयाकडे अर्ज केला आहे. आरोपी सतीश भोसलेचे वकील शशिकांत सावंत यांच्याकडून अटकपूर्व जमिनीसाठी बीड न्यायालयात अर्ज देण्यात आला आहे.

खोक्याच्या अटकेसाठी थेट अजित पवारांची घेतली भेट

  • सतीश उर्फ खोक्या भोसले प्रकरणी बीडच्या एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.
  • ढाकणे पिता-पुत्र मारहाण प्रकरणी संपूर्ण घटनाक्रम 
  • शिरूरमध्ये काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चानंतर ढाकणे पिता पुत्रावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबतही माहिती दिली.
  • शिष्टमंडळाने खोक्याची कुंडलीच उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोर मांडली 
  • उपमुख्यमंत्र्यांनी आजच्या आज खोक्याला अटक करण्याचा शिष्टमंडळाला दिला शब्द
  • सतीश उर्फ खोक्या भोसले कडून वकिलामार्फत अटकपूर्व जमिनीसाठी बीड न्यायालयात अर्ज

हे वाचलं का?

    follow whatsapp