अतीक-अशरफ हत्येच्या 3 तासापूर्वी काय घडलेलं?, अंगावरा काटा आणणारी कहाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

All serious questions of Atiq Ahmed and Ashraf are answered in 3 hours from 7:30 PM to 10:30 PM.
All serious questions of Atiq Ahmed and Ashraf are answered in 3 hours from 7:30 PM to 10:30 PM.
social share
google news

Atiq Ashraf murder case:

ADVERTISEMENT

प्रयागराज: उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये (Prayagraj) गेल्या शनिवारी म्हणजेच 15 एप्रिल रोजी कॅमेरासमोर अशी घटना घडली ज्याने अवघा देशच हादरुन गेला. माफिया आणि माजी खासदार अतीक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिसांच्या गरड्यातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अतीक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना ही हत्या करण्यात आली होती. यावेळी तीन शूटर्सने मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरच गोळ्या झाडून दोन्ही भावांची हत्या तर केलीच, शिवाय यूपी पोलिसांना देखील एक प्रकारे आव्हान दिले. (All serious questions of Atiq Ahmed and Ashraf are answered in 3 hours from 7:30 PM to 10:30 PM.)

पोलिसांच्या ताब्यात असतानाही अतीक अहमद आणि अशरफ यांची ज्या प्रकारे हत्या झाली त्यावरुन काही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पण या सर्व गंभीर प्रश्नांचे उत्तर रात्री साडे सात ते साडे दहा या 3 तासांमध्ये असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे या 3 तासांमध्ये नेमकं काय घडले हे पाहणे महत्वाचे आहे. याचबाबत आज तकचे प्रतिनिधी आणि घटनेचे प्रत्यक्षदर्शी समर्थ श्रीवास्तव यांनी त्या 3 तासांमध्ये काय काय घडले याबाबत सविस्तर माहिती समोर आणली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मारेकरी अतीक आणि अशरफच्या डोक्यात गोळ्या झाडताना ‘तो’ चौथा व्यक्तीही होता हजर?

शनिवार – 15 एप्रिल 2023 :

अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांना प्रयागराजमधील धुमनगंज पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. इथेच दोघांची चौकशी सुरू होती. अतिक आणि अशरफ हे दोघेही शुक्रवारी संपूर्ण रात्र झोपले नव्हते. दोघेही सतत असदच्या दफनविधीची माहिती घेत होते. अशरफ आणि अतिक यांना ठेवण्यात आलेल्या धुमनगंज पोलिस ठाण्यापासून असदचे अत्यंविधी झालेल्या कासारी-मासारी स्मशानभूमीचे अंतर 5 किलोमीटर आहे. मुलाच्या अंत्यसंस्काराची बातमी आल्यानंतर शनिवारी दिवसभर अतिक आणि अशरफ एकाच पोलीस ठाण्यात होते. यादरम्यान दोघांची चौकशी करण्यात आली.

15 एप्रिल 2023 – दिवसभर काय काय घडलं?

असदचे अत्यंविधी पूर्ण केल्यानंतर सुमारे 8 तासांनी म्हणजे साधारण शनिवारी दुपारच्या वेळी धुमनगंज पोलीस अतिक आणि अशरफला घेऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर आले. मीडियाचा ताफाही मागे होता. सुमारे 17 किलोमीटर प्रवास केल्यानंतर, अतिक आणि अशरफ यांना उमेश पाल खून खटल्याच्या संदर्भात काही रिकव्हरीसाठी प्रयागराजमधील शेवटचे पोलिस स्टेशन असलेल्या पूरमुफ्ती पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले. दोघेही सुमारे अर्धा तास इथे होते. यानंतर पोलिसांच्या वाहनांचा ताफा पुन्हा धुमनगंज पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. दोघांना गाडीतून उतरवून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

ADVERTISEMENT

Atiq Ahmed : अतिक, अशरफच्या हत्येमागे नक्की कोण? आरोपी अन् 15 प्रश्न

संध्याकाळी 7.30 वाजता :

दोघांना उतरवून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि इथूनच कथा सुरू झाली. खरंतर, अतीक अहमदला मेडिकलसाठी आणले जाईल, या आशेवर लखनौ आणि दिल्लीहून आलेले बहुतेक पत्रकार कोल्विन हॉस्पिटलबाहेर उभे होते. अतिक आणि अशरफ यांना पोलिस कोठडीत पाठवण्याबरोबरच दोघांचीही दर 24 तासांनी वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या आदेशाप्रमाणे 14 एप्रिलच्या रात्री म्हणजेच शुक्रवारी त्याच कोल्विन हॉस्पिटलमध्ये दोघांची वैद्यकीय चाचणी झाली. त्यानंतर शनिवारी रात्री वैद्यकी चाचणी होणार होती.

ADVERTISEMENT

बहुतेक पत्रकार हॉस्पिटलमधून निघून गेले होते :

अतिक आणि अशरफ यांच्या वाहनांचा ताफा पूरमुफ्ती पोलिस स्टेशनमधून थेट धूमनगंज पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तेव्हा कोल्विन हॉस्पिटलबाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांना वाटले की आज दोघांचे मेडिकल होणार नाही. हाच विचार करुन काही स्थानिक पत्रकार सोडले तर दिल्ली आणि लखनौहून आलेले सर्व पत्रकार हॉस्पिटलमधून निघून गेले.

दुसरीकडे, आज तकचे रिपोर्टर समर्थ श्रीवास्तव आणि कॅमेरामन नीरज धुमनगंज पोलीस स्टेशनमध्येच होते. आज मेडिकल होणार नाही असं इतरांप्रमाणेच समर्थ श्रीवास्तव यांनाही वाटलं. पण काही वेळ ते तिथंच थांबून राहिले. सुमारे अर्ध्या तासानंतर समर्थ यांना अचानक पोलिसांच्या हालचालीमध्ये वेगळेपणा जाणवू लागला, अचानक गडबड वाढली. एका पोलीस कर्मचाऱ्याने समर्थ यांना सांगितलं की आतिकला कोल्विन हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी सुरू आहे. हे समजताच समर्थ आणि त्यांचा कॅमेरामन नीरज अतीकच्या ताफ्यापूर्वी कोल्विन हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

15 एप्रिल 2023, रात्री 10.30 च्या सुमारास :

धुमनगंज पोलिस स्टेशनपासून कोल्विन हॉस्पिटलचे अंतर ५ किलोमीटर आहे. प्रवास फक्त 15 मिनिटांचा आहे. समर्थ श्रीवास्तव हॉस्पिटलच्या गेटवर उभे होते. त्यांच्यासोबत अजून काही पत्रकार हॉस्पिटलबाहेर उभे होते. रात्री 10.30 च्या सुमारास अतिक आणि अशरफ यांना घेऊन पोलिसांचा ताफा कॉल्विन हॉस्पिटलच्या मुख्य गेटबाहेर येऊन थांबला. नियमाप्रमाणे गाडी आत येणे अपेक्षित होते. मात्र पोलिसांनी रुग्णालयाच्या गेटबाहेर गाडी थांबवली आणि अतिक आणि अशरफ यांना पायीच रुग्णालयात घेऊन जाऊ लागले.

अतिक अहमदची ‘अफाट’ संपत्ती… आता कोण असणार वारसदार?

अतिक आणि अशरफला पाहताच समर्थ यांनी आपला माईक पुढे केला. ते त्या दोघांना प्रश्न विचारत होते. कॅमेरामन नीरज त्या दोघांना कॅमेऱ्यात कैद करत होते. समर्थांनी प्रश्न विचारला होता, त्याला उत्तर देताना अशरफ बोलू लागला. तो म्हणाला, “मुख्य गोष्ट म्हणजे गुड्डू मुस्लिम आहे…” बस्स… अशरफ एवढंच बोलला, तेवढ्यात गोळ्यांचे आवाज चालू झाले आणि काही सेकंदांनी अतिक, अशरफ यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात समोर पडले होते.

गेटपासून हल्ल्याच्या ठिकाणापर्यंत अतिक आणि अशरफ मोजून 10 पावलेच चालले होते. अशरफ बोलणेही पूर्ण करू शकला नाही. त्याआधीच दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्या. तुम्ही-आम्ही सर्वांनी हे दृश्य टीव्हीवर पाहिले, पण समर्थ आणि नीरज यांनी ते उघड्या डोळ्यांनी पाहिले, अगदी जवळून. अतिक आणि अशरफ यांच्यावर ज्या ठिकाणी हल्ला झाला ते ठिकाण त्या दोघांची वैद्यकीय चाचणी होणार होती त्या ठिकाणापासून अवघ्या 15-20 पावलांच्या अंतरावर होते.

इथूनच पोलिसांभोवती संशयाचं धुकं वाढलं :

हल्ल्यानंतर पोलीस संशयाच्या फेऱ्यात आले आहेत. त्याला कारणही तसेच आहे. हॉस्पिटलच्या भल्या मोठ्या गेटमधून पोलिसांची गाडी हॉस्पिटलच्या आत सहज जाऊ शकते. आतापर्यंत गाड्या नेहमीच आत येत आल्या आहेत. मग पोलिसांनी त्याचदिवशी अतिक आणि अशरफ यांना हॉस्पिटलच्या गेटबाहेर गाडीतून खाली का उतरवले? तेही अतिकवर केव्हाही हल्ला होऊ शकतो, असा अंदाज खुद्द पोलिसांनी वर्तवला होता.

पोलिसांचे वाहन गेटबाहेर का थांबवले?

रुग्णालयाच्या गेटबाहेर पोलिसांचा बंदोबस्त, आत आणि बाहेरील सुरक्षेचे फोटो नीट पाहिल्यास हे स्पष्ट होते की, पोलिसांनी अतिक आणि अशरफ यांना रुग्णालयाच्या गेटबाहेर उतरवण्याऐवजी गाडीतून थेट आतमध्ये आणले असते, तर मीडियावाल्यांनीही त्यांना त्या दोघांच्या इतक्या जवळ जाता आले नसते. विशेष म्हणजे तिन्ही हल्लेखोर माध्यमकर्मींच्याच वेशात आले होते. त्यामुळेच मार्ग आणि सुविधा दोन्ही अस्तित्वात असताना गेटच्या बाहेरच वाहन का थांबवले? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

हल्लेखोरांनी रेकी केली का?

14 एप्रिलच्या रात्री अतिक आणि अशरफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी याच कोल्विन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. मात्र, त्यादिवशीही गाडी गेटबाहेर थांबली होती. 14 एप्रिलच्या रात्री मीडिया कर्मचार्‍यांच्या वेशात तिन्ही हल्लेखोरांनी इथे रेकी केली होती का? हा हल्ला केव्हा, कुठे आणि कोणत्या वेळी करायचा याचा त्यांनी अभ्यास केला असावा का? असाही सवाल विचारला जात आहे.

हॉस्पिटल प्रशासनाचा खळबळजनक खुलासा :

दुसरीकडे ज्या कोल्विन रुग्णालयात अतिक आणि अशरफ यांची वैद्यकीय तपासणी होणार होती, तिथले मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नाहिदा सिद्दीकी यांनी खळबळजनक खुलासा केला. ते म्हणाले, अतिक आणि अशरफची वैद्यकीय तपासणी 15 एप्रिलच्या रात्री होणार आहे याची पोलिसांनी रुग्णालयाला कोणतीही कल्पना दिली नव्हती. नेहमीच अशा प्रकरणांमध्ये हॉस्पिटलला आधी माहिती दिली जाते. जेणेकरून रुग्णालय त्यानुसार तयारी करते.

अतीक-अशरफला डोक्यात गोळ्या घातल्यानंतर का पळाले नाही हल्लेखोर?, सांगितलं ‘हे’ कारण

पोलीस ठाण्यात वैद्यकीय तपासणीही करता आली :

14 एप्रिल रोजी अतिक आणि अशरफ यांना रुग्णालयात आणले असतानाही रुग्णालयाला अवघ्या 10 मिनिटांपूर्वीच याबाबत माहिती देण्यात आली होती, असेही डॉ. नाहिदा सिद्दीकी सांगितले. कोल्विन हॉस्पिटलच्या प्रशासनाने म्हटलं की, पोलिसांना हवे असते तर अतिक आणि अशरफची वैद्यकीय तपासणी धुमनगंज पोलिस स्टेशनमध्येच करता आली असती. यापूर्वीही अनेकवेळा असे केले असून पोलिसांनीच अशा आरोपींची पोलिस ठाण्यात वैद्यकीय तपासणी करून घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: अशा आरोपींची, ज्यांच्या जीवाला धोका आहे.

प्रश्नावर प्रश्न… :

कोल्विन हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा हा खुलासा अनेक प्रश्न निर्माण करतो. अतिक आणि अशरफ, ज्यांच्यावर उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. त्यानंतरही त्या दोघांची पोलिस ठाण्यात वैद्यकीय तपासणी का झाली नाही? हा निर्णय कोणाचा होता? रुग्णालयाला न कळवता दोघांनाही अचानक वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात का नेण्यात आले?

अशा प्रत्येक प्रकरणात रुग्णालयाला नेहमीच काही वेळ अगोदर माहिती दिली जाते. जेणेकरून रुग्णालयाला वैद्यकीय तपासणीशिवाय इतर गोष्टींची तयारी करता येईल. मग याच प्रकरणात आधी माहिती का देण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न आहेत. असद आणि गुलाम यांच्या चकमकीबाबतही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण अतिक आणि अशरफच्या मृत्यूमुळे असद आणि गुलामच्या चकमकीवर काही काळ पडदा पडल्याच दिसून येत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT