Pune : पुण्यातील रस्त्यावर थरार! मद्यधुंद बसचालकाने उलटी पळवली बस, 15 वाहनांना उडवले
पुण्यात आज पुन्हा एकदा 2012 मधील घटनेची पुनवरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळाली. संतोष मानेसारख्या निलेश सावंत या पीएमटी बसचालकाने उलटी बस चालवून 15 वाहनाने उडवले. हा व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
ADVERTISEMENT
Pune News: पुण्यात 25 जानेवारी 2012 मध्ये स्वारगेट पीएमटी (PMT Bus) स्थानकातून बस पळवून चालक संतोष मानेने 9 जणांना चिरडलं होते. त्या अपघातात 37 जण जखमी झाले होते. त्याच संतोष मानेच्या (Santosh Mane) बेदरकार गाडी चालवण्याची पुनरावृत्ती आज पुण्यात पुन्हा एकदा झाली. आजही पीएमटी बस चालक (Bus Driver) निलेश सावंतनेही (Nilesh Sawant) दारु पिऊन उलटी पीएमटी बस चालवून 10 ते 15 वाहनांना धडक देत अनेक वाहनांचे नुकसान केले आहे. त्यामुळे 2012 साली घडलेल्या संतोष मानेच्या निष्काळजी ड्रायव्हिंगच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. सिटी बस उलटी चालवून नागरिकांना घाबरवून सोडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल (Video Viral) झाला आहे. या घटनेमुळे सेनापती बापट रोड (Senapati Bapat Road) वेताळबाबा चौकातील नागरिकांची घाबरून तारांबळ उडाली होती.
ADVERTISEMENT
‘त्या’ घटनेची पुनरावृत्ती
पुण्यात संतोष माने या बेदरकार चालकाने निष्काळजीपणे बस चालवून 9 जणांना चिरडले होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये त्याकाळी प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा ही घटना घडल्याने पुणेकर हादरून गेले आहेत. ही घटना पाहून अनेकजणांना संतोष मानेच्या निष्काळजी ड्रायव्हिंगची आठवण झाली.
हे ही वाचा >> प्रेम, बलात्कार अन्…; बॉयफ्रेंडसाठी स्वित्झर्लंडहून आली भारतात, नंतर…
बेदरकार ड्रायव्हिंग
निष्काळजीपणे बस चालवून नागरिकांचे जीव घेणाऱ्या संतोष मानेप्रमाणेच निलेश सावंतनेही दारु पिऊन बस चालवल्याने अनेक वाहनांना त्याचा फटका बसला आहे. निलेश सावंतने उलटी बस चालवल्यामुळे 10 ते 12 वाहनांचेही नुकसान झाले आहे. उलटी बस चालवत वाहनांना धडक देत पुढं जात असल्याने अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
हे वाचलं का?
पुणे के वेताल बाबा चौक के पास एक पीएमटी बस ड्राइवर ने शराब के नशे में अचानक बस को आगे पीछे घूमना शुरू कर दिया और कई गाड़ियों को टक्कर भी मार दी। #punenews #PUNEBUS pic.twitter.com/lycIlemKpO
— Dharmendra Singh (@DharmendraSing7) October 22, 2023
ADVERTISEMENT
व्हिडीओ झाला व्हायरल
सेनापती बापट रोड वेताळबाबा चौकामध्ये पीएमटी बस चालकाकडून निष्काळजीपणे उलटी बस चालवत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये नागरिक ओरडतानाचा आणि वाहनांना धडक देत असल्याचेही त्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Dasara Melava 2023 : “काही जण खाल्ल्या ताटात थुंकणारे, खोक्यांपायी…” ठाकरेंचा टीझर रिलीज
सावंतला तात्काळ अटक
निलेश सावंत ज्या उलट बस चालवत होता. त्यावेळी पीएमटीमधून 50 प्रवाशी प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्याकडून आरोडाओरडही करण्यात येत होता. निष्काळजीपणे आणि उलटी बस चालवल्याप्रकरणी आता निलेश सावंत विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT