अल्पवयीन गर्लफ्रेंडसोबत रोहित लिंगायतची हाय व्होल्टेज टॉवरला गळफास लावून आत्महत्या

मुंबई तक

Chandrapur Couple Suicide: एका 25 वर्षीय तरुणाने त्याच्या अल्पवयीन गर्लफ्रेंडसोबत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय.

ADVERTISEMENT

चंद्रपूरमध्ये युवक युवतीची आत्महत्या
चंद्रपूरमध्ये युवक युवतीची आत्महत्या
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वीजेच्या हाय व्होल्टेज टॉवर गळफास लावून जोडप्याची आत्महत्या

point

25 वर्षीय तरुणाचे अल्पवयीन मुलीसोबत होते प्रेम संबंध

point

26 फेब्रुवारीपासून दोघेही झाले होते बेपत्ता

Chandrapur Loving couple Suicide Case: विकास राजूरकर, चंद्रपूर: चंद्रपूरमध्ये एका प्रेमी युगुलाने हाय व्होल्टेज वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे. 25 वर्षीय प्रियकर आणि त्याच्या अल्पवयीन प्रेयसीचे मृतदेह टॉवरला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आता पोलीस या आत्महत्येमागील कारणांचा तपास करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तहसीलमधील उच्छली गावातील आहे. प्रेमी युगुलाने गावाबाहेर शेतात बांधलेल्या हायव्होल्टेज वीज टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केली.

25 वर्षीय रोहित रमेश लिंगायत आणि 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलत आपले जीवन संपवलं आहे. या दोघांचं मागील काही महिन्यांपासून प्रेमप्रकरण सुरू होतं. उच्छली गावातील रोहित लिंगायत या तरुणाचे चांडाली गावातील एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते, ती मुलगी नववीत शिकत होती आणि भंडारा जिल्ह्यातील एका वसतिगृहात राहत होती. तिचे पालक कामगार आहेत. ती काही दिवसांपूर्वी वसतिगृहातून घरी आली होती.

हे ही वाचा>> Pune : पोलीस आणि दरोडेखोर आमने-सामने, कोयत्यांना गोळीबाराने उत्तर, थरारात पोलीस जखमी, आरोपी अटक

26 फेब्रुवारी रोजी सकाळी तिचे वडील कामावर गेले होते आणि आई घरकामात व्यस्त असताना रोहित दुचाकीवरून तिच्या घरासमोर आला आणि त्याने मुलीला घराबाहेर बोलावले आणि दोघेही दुचाकीवरून पळून गेले.

दोघेही 26 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. मुलीच्या पालकांनी तिच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो बंद होता. त्यामुळे मुलीच्या पालकांनी ब्रह्मपुरी पोलिसात तक्रार दाखल केली होती. 

दरम्यान, काल (2 मार्च) काही नागरिकांनी गावाबाहेरील शेतात एका अज्ञात जोडप्याचे मृतदेह विजेच्या टॉवरला लटकलेले पाहिले. ज्याबाबत गावकऱ्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. याच वेळी पोलीस बेपत्ता झालेल्या तरुणीच शोध घेत होते. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहांची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

हे ही वाचा>> Beed : "न्याय मिळेपर्यंत लढणार, डेड बॉडी परत आली तरी चालेल", मृत महादेव मुंडेंच्या पत्नीचं आजपासून आमरण उपोषण

मुलीने दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि मुलाने देखील मुलीच्याच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या दोघांनी एका दुचाकीवर उभं राहून ही आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दरम्यान, गावाबाहेर प्रेमी युगुलांच्या आत्महत्येची बातमी कळताच संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

पण असं नेमकं काय घडलं की, ज्यामुळे प्रेमीयुगुलांना आत्महत्या करण्यास भाग पाडले गेले? 26 फेब्रुवारीपासून ते नेमके कुठे गायब झाले होते? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. सध्या पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांना बोलावून पंचनामा केला आहे आणि ब्रह्मपुरी पोलीस पुढील तपासात गुंतले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp