Santosh Deshmukh Murder : क्रूरतेचा कळस! संतोष देशमुखांची अमानुष हत्या, सर्वात धक्कादायक फोटो आले समोर

निलेश झालटे

Santosh Deshmukh Murder Latest Update : 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर आरोपींच्या विकृतीचे फोटो समोर आले आहेत.

ADVERTISEMENT

Santosh Deshmukh Murder Viral Photo
Santosh Deshmukh Murder Viral Photo
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुखांच्या हत्येचा मोठा पुरावा आला समोर

point

क्रूरपणे हत्या केल्याचे आरोपींचे फोटो व्हायरल

point

9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या

Santosh Deshmukh Murder Latest Update :  बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या हत्याप्रकरणी वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार असल्याचं दावा सीआयडीने चार्जशीटमध्ये केला आहे. अशातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणाचं आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर आरोपींच्या विकृतीचे फोटो समोर आले आहेत. अतिशय क्रूरपणे संतोष देशमुखांची हत्या केल्याचं या फोटोंच्या माध्यमातून उघडकीस आलंय. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना सीआयडीच्या हाती एक महत्त्वाचा व्हिडिओ सापडला आहे. या व्हिडिओमध्ये सहा आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. सहाही आरोपी अत्यंत क्रुरपणे संतोष देशमुख यांची कपडे काढून त्यांना मारहाण अमानुष मारहाण करत होते.सर्वात मोठी विकृती म्हणजे ही मारहाण सुरु असताना इतर आरोपी मोठमोठ्याने हसत त्यांच्या मारहाणीचा आनंद साजरा करत होते, असं या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी एक व्हिडिओ कॉलही सुरु होता, जो जयराम चाटे याने एका वॉट्सअप ग्रुपवर केला होता. हा सर्वात मोठा डिजीटल पुरावा सीआयडीने सादर केला आहे. 

संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर मारहाण करताना कृष्णा आंधळेनं एका व्हाट्सअप ग्रुपवर कॉल केला होता. 
मोकारपंती असं या व्हाट्सअप ग्रुपचं नाव होतं. ज्यामध्ये पाच ते सहा जण संतोष देशमुख यांना कसं मारहाण करत होते, हे पाहिलं जात होतं. फॉरेन्सिक कडून हा व्हिडिओ सीआयडीला मिळाल्यानंतर त्याचे छोटे छोटे दहा ते बारा व्हिडिओ तयार झाले आणि त्यातूनच या व्हिडिओमधील व्यक्ती आणि सीआयडीने या प्रकरणात ताब्यात घेतलेली व्यक्तींची फॉरेन्सिक तपासणी झाली. या व्हिडिओतील काही फोटो हे या आरोप पत्रात जोडण्यात आले आहेत. ज्यामध्ये सुदर्शन घुले कशाप्रकारे संतोष देशमुखांना मारहाण करतोय हे समोर आलंय. 

हे ही वाचा >> "महाराष्ट्रात गुंडांचं राजकारण, त्या आरोपीला...", कैलास बोराडे मारहाण प्रकरणावरून अंजली दमानीया संतापल्या!

अत्यंत धक्कादायक म्हणजे, संतोष देशमुख यांचे कपडे काढल्यानंतर कशाप्रकारे त्यांना वागणूक दिली, हे सुद्धा या फोटोंच्या माध्यमातून उघडकीस आलं आहे. व्हिडिओ बनवत असतानाच सुदर्शन घुले त्यानंतर सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले हे हसत हसत मारहाण करत होते. संतोष देशमुख यांच्या हत्या वेळेचे सर्व व्हिडिओ आणि फोटो पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेत. संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा एक व्हिडिओ काढण्यात आला आणि त्या व्हिडिओमधील 12 फोटो हस्तगत करण्यात आले. संतोष देशमुख यांच्या हत्या वेळी तीन व्हिडिओ काढण्यात आले आणि ते व्हिडिओ देखील सीआयडीने हस्तगत केले आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम सीआयडीने दोषारोपत्रात पत्रात सांगितलं आहे. 

हे ही वाचा >> "घटना अंधारात कोपऱ्यात झाली नाही, त्या मुलीला...", पुणे बलात्कार प्रकरणावर सुप्रिया सुळेंचं खळबळजनक विधान!

आरोपींनी माणुसकीला काळीमा फासणारं हे कृत्य केल्याचं समोर आलंय. दोषारोप पत्रातील फोटोंच्या माध्यमातून खळबळजनक माहिती समोर आलीय. आरोपी जयराम चाटेने संतोष देशमुखांची पॅन्ट काढली. त्यानंतर दुसरा आरोपी महेश केदार हा त्या दृश्याची सेल्फी घेत हैवानासारखा हसत असल्याचं दोषारोपपत्रात म्हटलं गेलं आहे. हे आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर प्रतीक घुलेनं देशमुखांच्या अंगावर लघुशंका केली. हा संपूर्ण प्रकार सुदर्शन घुलेनं कॅमेरात कैद केला. तसच जयराम चाटे देशमुखांच्या अंगावरचा शर्ट ओरबाडून काढतो आणि शर्ट हातात घेऊन हसत असल्याचं या फोटोंच्या माध्यमातून समोर आलंय. आरोपींनी पाईप आणि वायरने संतोष देशमुखांच्या अंगावर वार केले.  लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिविगाळ केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp