Crime: तरुणाने विवाहित महिलेचा जबडाच फाडला, प्रेमसंबंध अन्...
प्रेमसंबंधातून एका तरुणाने 30 वर्षीय विवाहित महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कराडमध्ये घडली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय आहे.
ADVERTISEMENT

सकलेन मुलाणी, कराड: कराडमध्ये प्रेमसंबंधातून एका महिलेवर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. कोयत्याने केलेल्या वार तिच्या कानापासून जबड्यापर्यंत गेला आहे. या हल्ल्यात संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असून कराड शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापूर आगाशिवनगर येथील दांगट वस्तीत काल (13 फेब्रुवारी) दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रवींद्र सुभाष पवार (वय 35 वर्ष) राहणार दांगट वस्ती आगाशिवनगर असे हल्लेखोराचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर कराड शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हल्लेखोर फरार झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा>> गुप्तांगाला लटकवले डंबेल, तोंडात कोंबलं मलम अन्... कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत हादरवून टाकणारं रॅगिंग
नेमकं प्रकरण काय?
आगाशिवनगर येथील महिलेचा विवाह झाला असून नवऱ्यासोबत झालेल्या वादामुळे ती महिला माहेरी राहत होती. त्या महिलेला 3 मुले आहेत.
हे ही वाचा>> Bandra मध्ये TC बनून 54 वर्षीय महिलेवर ट्रेनमध्ये बलात्कार, सुन्नं करणारं प्रकरण!
या महिलेचा आरोपी रवींद्र याच्याशी पूर्वीचाच परिचय आहे. या परिचयातूनच त्यांची ओळख वाढून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. गुरुवारी दुपारी रवींद्र त्या महिलेच्या घरी गेला होता त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला त्यानंतर रवींद्रने महिलेवर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात तिच्या कानापासून जबड्यापर्यंत वार गेला आहे. त्यामुळे ती महिला गंभीर जखमी झाली असून त्या महिलेवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.
हल्ला केल्यानंतर रवींद्र पवार घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आले आहेत. तर पीडित महिलेच्या वडिलांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामाही केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कराड शहर पोलीस करत आहेत.