Satish Bhosale : प्रयागराजमध्ये लपलेला खोक्या कसा सापडला? 'या' चार गुन्ह्यांमुळे सतीश भोसलेचा पाय खोलात

मुंबई तक

बॅटने मारहाण, दात पाडेपर्यंत मारहाण करणाऱ्या खोक्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस त्याला शोधत होते. मात्र, माध्यमांना मुलाखती देत असूनही तो पोलिसांना कसा सापडत नाही असा सवाल उपस्थित होत होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पोलिसांना गुंगारा देणारा खोक्या अखेर सापडला

point

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये लपला होता खोक्या

point

पोलीस खोक्याला विमानाने महाराष्ट्रात आणणार

Beed Crime : बीडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या घटनांमध्ये आता एक वेगळा ट्वीस्ट आला आहे. ज्या सुरेश धस यांनी बीडमध्ये घडलेलं संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण लावून धरलं, त्यांचाच कार्यकर्ता एका प्रकरणात पोलिसांच्या रडारवर आहे. बॅटने मारहाण, दात पाडेपर्यंत मारहाण करणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलीस शोधत होते. एका इलेक्ट्रॉनिक माध्यमाला दिलेल्या मुलाखतीनंतर, पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. मात्र, याच मुलाखतीनंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र वेगाने फिरवली होती. त्यानंतर पोलिसांना खोक्या उत्तरप्रदेशमध्ये गेल्याचं कळलं होतं. (Satish Bhosale Arrested from Prayagraj in Uttar Pradesh)

खोक्या कसा सापडला? 

पोलिसांनी तपास केल्यानंतर लक्षात आलं की, खोक्या उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये लपला होता. महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या संपर्कानंतर प्रयागराज पोलिसांनी खोक्या भोसलेला अटक केली होती. त्यानंतर आता बीड पोलिसांनी खोक्याचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू केलीय. खोक्याला घेण्यासाठी बीड पोलिसांचं एक विशेष पथक प्रयागराजला दाखल झालं होतं. त्यानंतर प्रयागराज एअरपोर्ट पोलीस ठाण्यातून खोक्याला ताब्यात घेत बीड पोलीस महाराष्ट्रात येणार आहेत. 

हे ही वाचा >> Crime : एक महिन्याच्या बाळाचं अपहरण, हजारो रिक्षा चालकांची चौकशी करत पोलिसांनी बाळ विकण्यापूर्वीच...

बीड पोलीस खोक्याला आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात घेऊन येणार आहेत. मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगर विमानतळावर खोक्याला आणलं जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आता खोक्यावर अनेक गुन्हे दाखल झाले असून, त्याचा पाय आणखी खोलात गेला आहे.

खोक्यावर कोणकोणते गुन्हे?

हे ही वाचा >> विधान परिषद निवडणूक: 'या' नावांची जोरदार चर्चा, पण भाजप वापरणार धक्कातंत्र?

बीडमधील शिरूर पोलीस ठाण्यात खोक्या भोसलेविरोधात एकूण चार गुन्हे दाखल आहेत. यामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्यान्वयेही खोक्यावर कारवाई होणारय. एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी खोक्या भोसलेचा शोध सुरू केला होता. याशिवाय ज्यावेळी पोलिसांनी खोक्या भोसलेच्या घराची तपासणी केली, त्यावेळी तिथं गांजा आणि काही अंमली पदार्थ आढळून आले. इतकंच नाही तर जिथं खोक्याचं घर आहेत, त्यावर मालकी हक्क सांगण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आलीय. खोक्याची मालकी सिद्ध न झाल्यास वनविभागाकडून अतिक्रमणाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp