Seema Haider : बॉर्डरवर मेकअप, मुलांना बोलण्याची ट्रेनिंग, सीमाच्या चौकशीत IBचे गंभीर खुलासे
केंद्रीय तपास यंत्रणा आणि इंटेलिजेन्स ब्युरोने देखील सीमा-हैदरची चौकशी केली आहे. या चौकशीतून अनेक गंभीर खुलासे करण्यात आले आहेत. यामुळे सीमा हैदरवरचा संशय आणखीणच बळावला जात आहे.
ADVERTISEMENT

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचा आता देशातील तपास यंत्रणांकडून तपास केला जात आहे. नुकतीच सोमवारी युपीच्या एटीएस टीमने सीमा आणि सचिनची 6 तास कसून चौकशी केली होती.या चौकशीनंतर आता केंद्रीय तपास यंत्रणा आणि इंटेलिजेन्स ब्युरोने देखील सीमा-हैदरची चौकशी केली आहे. या चौकशीतून अनेक गंभीर खुलासे करण्यात आले आहेत. यामुळे सीमा हैदरवरचा संशय आणखीणच बळावला जात आहे.
बॉर्डरवर पेहराव बदलला..
केंद्रीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनूसार, सीमा हैदर ही देशातील ग्रामीण भागातील महिला वाटावी यासाठी तिचा मेकओव्हर करण्यात आला होता. इतकेच नाही तर तिला साधी साडी परिधाण करण्यास दिली होती, तिच्या चारही मुलांचे पौषाखही बदलण्यात आले होते. जेणेकरून सीमा आणि तीची मुले भारतीय वाटावीत. तपास यंत्रणानुसार अशा गोष्टी मानवी तस्करी किंवा सेक्स रॅकेट सारख्या प्रकरणात होत असतात. तसेच सीमा ज्या भाषेत बोलते आहे, त्या भाषेची ट्रेनिंग नेपालमध्ये दिली जाते. पाकिस्तानी हॅंडलर अशा प्रकारच्या ट्रेनिंग देऊन महिलांकडून बेकायदेशीर घटना घडवून आणण्यासाठी त्यांना सीमा ओलांडून भारतात पाठवतात. त्यामुळे आता तपास यंत्रणांनी या पाकिस्तानी हॅंडलरचा तपास सुरु केला आहे.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
सीमा आणि सचिनने नेपालमार्गे भारतात शिरकाव केल्याची माहिती दिली आहे. यासह दोघांनीही त्यांच्या प्रवासाचा रूट सांगितला होता. त्यानुसार पोलिसांनी या रूटवरील सीसीटीव्ही फुटजे काढून तपासायला सुरुवात केली आहे. भारत-नेपाल सीमेवरील 13 मे दरम्यानचे सर्व बस रुटचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
हे ही वाचा : लव, सेक्स आणि धर्मांतर! मीरा रोडमधील 22 वर्षीय तरूणीसोबत काय घडलं?
थर्ड नेशन सिटीजन
दरम्यान एका तिसऱ्या व्यक्तीच्या मदतीने सीमाने भारतात प्रवेश केल्याची माहिती आहे.थर्ड नेशन सिटीजन (तिसरा व्यक्ती) म्हणजे भारत नेपालऐवजी तिसऱ्या देशाचा नागरीक दोन्ही देशाचा सीमेवर उपस्थित असने किंवा सीमा ओलांडण्याचा प्रयत्नकरणे. भारत-नेपालमध्ये सध्या मैत्रीचे संबंध असल्या कारणाने तिसऱ्या देशाचा नागरीक आल्यास याची माहिती तपास यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांना देण्यात येते. परंतू अशी कोणतीच माहिती तपास यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांना मिळाली नाही आहे. त्यामुळे भारत-नेपाल सीमेवर असलेल्या चार आईसीपी आणि इंटीग्रेटेड चेकपोस्टवरील रेकॉर्डचीही तपासणी केली जात आहे. या ठिकाणाहून तरी तिसऱ्या व्यक्तीने प्रवेश केला नाही ना, याचा तपास सुरु आहे.
संशय निर्माण करणारे 10 प्रश्न
1) 4 मुलांची आई स्वत:ला पाकिस्तानच्या लहान शहरातली रहिवाशी म्हणते, मग ती PUBGवर दिवसभर व्यस्त कशी असते?
2) पाचवी पास सर्वसामान्य महिलेकडे दोन पासपोर्ट कशासाठी आहेत?
3) आपल्या 4 मुलांना सोडून सचिनला भेटायला नेपाळला कशी आली?
4)दुसऱ्यांदा पाकिस्तानी सीमा ओलांडून परतल्यावर चार मुलांसाठी नवीन पासपोर्ट बनवून ती कशी परतली?
5) सीमाकडे इतके पैसै आले कुठून? घर विकल्याचे सीमा सांगते. पण पाकिस्तानमध्ये संपत्तीत महिलांना इतके अधिकार आहेत का?
6)नवऱ्याच्या नकळत तिने घर कसे विकले?
7)सीमा दुबईला जाते आणि पाकिस्तानी पैशाना दिरहममध्ये बदलते आणि दुबईत आरामात हॉटेल आणि कॅबची बुकींग कशी करते.
8) घुसखोरीच्या आरोपाखाली अटक होऊन सुद्धा ती इतकी शांत का दिसते?
9) सीमाने तिचा आणि तिच्या चार मुलांचे डुप्लिकेट आधारकार्ड कसे बनवले?
10) पाकिस्तानमध्ये ज्या फोनचा वापर केला होता, त्यामधील एकही फोन ती भारतात का घेऊन आली नाही. नेपालमध्ये तिने इतर व्यक्तीच्या हॉटस्पॉटच्या आधारावर व्हॉट्सअॅप कॉल केले. तसेच पाकिस्तानात पर्सनल लॅपटॉप का सोडून आली?
दरम्यान तपास यंत्रणांनी सीमावर उपस्थित केलेल्या प्रश्नावरून तिच्यावरचा संशय आणखीणच बळावत चालला आहे. या प्रकरणात आणखीण धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.