Disha Salian : नाईट पार्टी, कॉकटेल आणि 14 व्या मजल्याची गॅलरी... दिशाच्या फ्लॅटमध्ये काय घडलं होतं?
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूला पाच वर्षे उलटली, तरी हे प्रकरण आजही चर्चेत आहे. 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

दिशा सालियानचा मृत्यू कसा झाला होता?

14 व्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये काय घडलं होतं?

दिशा सालियानने त्या दिवशी मद्यप्राशन केलं होतं?
Disha Salian Case : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत आरोप केला की, दिशा सालियान हिचा अपघाती मृत्यू झाला नव्हता. तर तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang Rape)करून तिची हत्या करण्यात आली. आता या प्रकरणाचा तपास एसआयटी करणार आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय की, त्या रात्री दिशा सालियनच्या फ्लॅटमध्ये काय घडलं होतं? पोलिसांनंतर सीबीआयच्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला आहे. हीच टीम सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत होती. यापूर्वी सीबीआयने दिशाच्या प्रकरणात दिलेला तपास अहवाल कुटुंबीयांनी योग्य असल्याचं मान्य केलं होता. त्यामध्ये CBI ने नेमकं काय म्हटलं होतं ते जाणून घेऊ.
दिशा आणि सुशांत यांच्या मृत्यूमध्ये 5 दिवसांचं अंतर
9 जून 2020 च्या मध्यरात्री पहाटे 2 वाजता इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशा सालियनचा मृत्यू झाला. 28 वर्षांची दिशा सालियन अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक होती. पाच दिवसांनंतर 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. त्यावेळी या दोघांच्याही मृत्यूबद्दल सर्व वेगवेगळ्या चर्चा झाल्या होत्या.
हे ही वाचा >> Disha Salian: 'दिशावर गँगरेप अन्...' आदित्य ठाकरेंसह 5 जणांची नाव, खळबळन उडवून देणारी दिशाच्या वडिलांची याचिका जशीच्या तशी
दोन दिवसांनी पोस्टमॉर्टम
या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जूनला दिशाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं. बोरिवली पोस्टमॉर्टम सेंटरमध्ये दिशाच्या शवविच्छेदनात दोन दिवसांचा विलंब का झाला? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. शवविच्छेदन अहवाल आल्यावर दिशाच्या मृत्यूमागे डोक्याला मार आणि विविध अनैसर्गिक जखमा झाल्याचं समोर आलं होतं. कारण ती 14व्या मजल्यावरून खाली पडली होती. त्यामुळे दिशाला अनेक दुखापती झाल्या होत्या.
शारीरिक हल्ल्याचा कोणताही पुरावा आढळला नाही
दिशा सालियनवर कोणत्याही प्रकारचा शारीरिक हल्ला झालेला नाही. 14व्या मजल्यावरून पडल्यामुळे झालेल्या अनेक दुखापतींचा उल्लेख अहवालात आहे. तसंच प्रायव्हेट पार्टला कुठेही दुखापत होण्याचा प्रश्नच नव्हता. पण त्यावेळी दिशाच्या मृत्यूमागे सोशल मीडियावर चर्चा सुरू होत्या. दिशाच्या मृत्यूचा सुशांतच्या मृत्यूशी थेट संबंध होता असंही म्हटलं जात होतं.
हे ही वाचा >> Disha Salian: महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी, 'दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या' वडिलांनी घेतलं थेट आदित्य ठाकरेंचं नाव!
त्या रात्री काय घडलं? सीबीआयने सांगितलं...
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूची चौकशी केली. CBI च्या टीमने दिशा सालियनच्या मृत्यूचाही तपास केला होता. सीबीआय टीमने दिशाची हत्या झाली नसल्याचा दावा केला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, ती खूप मद्यधुंद होती, त्यामुळे ती तिच्या फ्लॅटमधून पडली होती. 8-9 जून 2020 च्या रात्री दिशाने तिच्या फ्लॅटमध्ये वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. तिचे अनेक मित्रही तिथे उपस्थित होते. दिशाने तिच्या बॉयफ्रेंड आणि मित्रांसोबत भरपूर मद्यपान केलं, त्यानंतर सर्वांनी जेवण केलं. दिशा तिच्या सोसायटीच्या 14व्या मजल्यावर राहत होती. पार्टी संपल्यानंतर ती घराच्या गॅलरीत उभी होती, तेव्हा अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली पडली. डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्यानं आणि जास्त रक्तस्त्राव झाल्यानं दिशाचा मृत्यू झाला. या तपासासाठी सीबीआयने वेगळा गुन्हा दाखल केलेला नाही.