पोटच्या तीन मुलींवर वासनांध बापाकडून वारंवार बलात्कार, एका मुलीचा 4 वेळा गर्भपात

मुंबई तक

नालासोपारा येथे एका वासनांध व्यक्तीने स्वत:च्या तीन मुलींवर पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्याप्रकरणी आता आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस

point

बापानेच केला स्वत:च्या तीन मुलींवर बलात्कार

point

पीडित मुलींपैकी एका मुलीचा तीन वेळा गर्भपात

नालासोपारा: पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील आरोपी पकडला गेला. या घटनेला एक दिवस होत नाही तर आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. ऐकून अंगावर शहारे येतील आणि किळस वाटेल अशी घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. वडील आणि मुलींचं नातं खास असतं असं म्हणतात, पण एका बापानं आपल्याच पोटच्या एक नव्हे तीन-तीन मुलींवर पाशवी बलात्कार केल्याची अत्यंत धक्कदायक घटना समोर आली आहे. 

पीडित मुलींमधील एका मुलीनं तक्रार केल्यानंतर हा सगळा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. ज्यानंतर सगळ्यांनाच मोठा हादरा बसला आहे.

नेमकं प्रकरण काय?

कोकणातल्या कणकवलीत एक कुटुंब राहत होतं. आई-वडील आणि 5 मुली. पण त्यापैकी तीन मुलींवर वडिलांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 56 वर्षाच्या या नराधम बापाने स्वत:च्याच मुलींचा लैंगिक छळ केला.

हे ही वाचा>> Pune: पाणी प्यायला गेला अन् पोलिसांना सापडला, नराधम दत्तात्रय गाडेच्या अटकेची Inside Story

ज्या तीन मुलींवर त्यानं अत्याचार केले त्यातील एक मुलगी 21 वर्षांची होती तर इतर दोन मुली अल्पवयीन आहेत. या तीनमधल्या एका मुलीचा तब्बल 4 वेळा गर्भपातही करण्यात आला आहे. म्हणजे हा सगळा घृणास्पद प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू होता. जो पीडित मुली या निमूटपणे सहन करत होत्या. या सगळ्या मुलींना कोणत्या मरणयातना सहन कराव्या लागल्या याचा विचारही आपण करू शकत नाही. 

अखेर या किळसवाण्या प्रकाराला वैतागून आरोपीच्या पत्नीने तिच्या पाचही मुलींना घेऊन नालासोपारा इथं नातेवाईकांकडे आश्रयाला आली. पण या सगळ्यानंतर आणखी एक प्रश्न निर्माण होतो की, इतके दिवस मुली आणि आरोपीची पत्नी ही गप्प का बसली?

हे ही वाचा>> Vasant More : वसंत मोरेंना थेट मातोश्रीवरुन फोन, स्वारगेटवर तोडफोड केल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

याबाबत पीडित मुलींनी पोलिसांना अशी माहिती दिली की, त्या आतापर्यंत वडिलांच्या दहशतीत होत्या आणि त्यामुळे त्या गप्प राहून सगळा लैंगिक अत्याचार सहन करत होत्या. 

दरम्यान, या तक्रारीनंतर नालासोपारा पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. मुलींनी तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याची नोंद केली आणि त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली

बलात्कारी बाप अन् खुनी नराधम

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुली आतापर्यंत वडिलांच्या दहशती खाली का होत्या याच कारणही आता समोर आलं आहे. ज्या माहितीनंतर पोलीसही चक्रावून गेले आहेत. 

पीडित मुलींच्या वडिलांवर आधीच अनेक गुन्हे दाखल होते. खंडणी, गोळीबार आणि हत्येचा गुन्हा देखील आरोपीवर आहे. 2004 साली आरोपी बापानं एका व व्यक्तीची हत्या कली होती अशी माहिती देखील समोर आली.

महाराष्ट्रात हत्या, बलात्कार, विनयभंग अशा घटना इतक्या सरार्सपणे सुरू आहेत की, लोकांना आता याबाबत फारसं आश्चर्य वाटत नाही. आपल्याच बापानं आपल्यावर लैंगिक अत्याचार केला म्हटल्यावर त्या मुलींची मानसिक अवस्था कशी असेल आणि त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा आपण विचारही करू शकत नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp