उत्तर दिलं नाही म्हणून विद्यार्थ्यासोबत असं काही केलं की शिक्षिकेला झाली अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

uttar pradesh sambhal muslim student asked slap student because he could not answer. So the student is depressed. case was registered against the teacher
uttar pradesh sambhal muslim student asked slap student because he could not answer. So the student is depressed. case was registered against the teacher
social share
google news

Uttar Pradesh Crime : गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच आहे. आता एका शाळेतील शिक्षिकेवर शाळेत जातीय द्वेष पसरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. विद्यार्थ्याने प्रश्नाचे उत्तर दिले नाही म्हणून शिक्षिकेने मुस्लिम विद्यार्थ्याला (muslim student) हिंदू वर्गमित्राला (slapped) मारायला सांगितली. या प्रकरणावरुन वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील संभल (uttar pradesh sambhal) जिल्ह्यातील असमोली परिसरात घडली आहे. दुगवारमध्ये एक खासगी शाळा आहे, तिथे ही घटना घडली आहे.(uttar pradesh sambhal hindu student slapped by muslim student after student could not answer)

ADVERTISEMENT

वाद हिंदू-मुस्लिम

विद्यार्थी शाळेत असताना शिक्षिकेने एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला होता. त्या विद्यार्थ्याला प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे शिक्षिकेने वर्गातीलच एका मुस्लिम विद्यार्थ्याला हिंदू विद्यार्थ्याला गालावर मारण्याची सूचना दिली. शाळेतील घडलेला हा प्रकार विद्यार्थ्याने आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनीही शिक्षिका शाईस्तावर जातीय द्वेष पसरवल्याच्या आरोपाखाली शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> पंकजा मुंडेंचा धक्कादायक गौप्यस्फोट! “मराठी असल्याने मलाही मुंबईत घर नाकारलं”

शिक्षिकेवर गुन्हा

विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर शिक्षिका शाईस्तावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेवर मुस्लिम विद्यार्थ्याला मारायला सांगून मुलाच्या भावना दुखावल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरु केला असून शिक्षिकेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिक्षिकेचे निलंबन

शिक्षिकेचे प्रकरण शाळा व्यवस्थापनाला समजताच त्यांनी त्या शिक्षिकेवर तात्काळ कारवाई केली आहे. मुख्याध्यापिका शमिना मोळ यांनी सांगितले की, त्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले असून शिक्षिकेला शाळेतूनही काढून टाकण्यात आले आहे.

विद्यार्थी मानसिक तणावाखाली

या प्रकरणाची माहिती देताना मुख्याध्यापिका शमिना मोळ यांनी सांगितले की, शिक्षकांना नोकरीला सुरुवात करण्याआधीच आम्ही त्यांच्याकडून स्टँप करुन घेतो. विद्यार्थ्यांचा कोणत्याही प्रकारे शारीरिक अथवा मानसिक छळ करणार नाही. मात्र सध्याच्या या प्रकरणात मुलगा मानसिक तणावाखाली गेल्याने शिक्षिकेवर तात्काळ कारवाई केली आहे.

ADVERTISEMENT

मुझफ्फरनगर घटनेची पुनरावृत्ती

मागील महिन्यातही मुझफ्फरनगरमधील खुब्बापूरमध्येही अशी घटना घडली होती. एका खासगी शाळेतील शिक्षकाने मुस्लिम मुलाला गृहपाठ केला नाही म्हणून त्याच्या वर्गमित्राकडून त्याला थप्पड मारण्यात आली होती. त्यावेळी शिक्षिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> नाशिकमध्ये बाप्पाला निरोप देताना काळाने साधला डाव! दोघांचा मृत्यू, तर दोघांचा…

प्रकरण सर्वोच्च न्यायालयात

मुझफ्फरनगरचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. त्यावरुन राज्य सरकारवर न्यायालयाकडून ताशेरे ओढण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT