बापाने आईचा गळा दाबला, पोरानं पाहिलं अन्... अनैतिक संबंधाच्या संशयामुळे हत्याकांड

मुंबई तक

Mumbai Crime: मुंबईतील कांदिवली परिसरात एका व्यक्तीने चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नी आणि मुलाची हत्या केली. हत्येला आत्महत्येचे स्वरूप देण्यासाठी, मृतदेह छताला लटकवण्यात आले.

ADVERTISEMENT

अनैतिक संबंधाच्या संशयामुळे हत्याकांड
अनैतिक संबंधाच्या संशयामुळे हत्याकांड
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नी आणि मुलाची गळा आवळून केली हत्या

point

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हत्या

point

पत्नीची हत्या करताना मुलाने पाहिलं म्हणून बापाने केली त्याचीही हत्या

मुंबई: मुंबईतील कांदिवली परिसरात एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि मुलाची हत्या करून त्यांनी आत्महत्या केल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. आरोपी शिवशंकर दत्ता (वय 40 वर्ष) याने सोमवारी पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी पुष्पा दत्ता (वय ३६ वर्ष) आणि मुलाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून तपास सुरू केला. परंतु आरोपींनी दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास केला. चौकशीदरम्यान, शिवशंकरने कबूल केले की त्याने आपल्या पत्नीचे अवैध संबंध असल्याचा संशयावरून तिची हत्या केली. हत्येच्या वेळी, त्यांच्या 10 वर्षांच्या मुलाने हे सर्व पाहिले, म्हणून त्याने त्याच्या मुलाचाही गळा दाबून खून केला.

हे ही वाचा>> Mumbai Crime News : 20 वर्षीय महिलेवर अत्याचार, स्टेशनवर बेशुद्धावस्थेत आढळली महिला, नराधम रिक्षा चालक?

दोघांनाही मारल्यानंतर आरोपी हा घरातून पळून गेला. तो दुपारी घरी आला आणि स्थानिक लोकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत शिरला. यानंतर सर्वांनी पाहिले की दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आरोपी शिवशंकरने चांगली योजना आखली होती पण पोलीस तपासात तो बरोबर अडकला.

पत्नी आणि 10 वर्षांच्या मुलाची हत्या

हत्येनंतर, आरोपींनी दोघांनीही आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी मृतदेह छताच्या स्टीलच्या रॉडला नायलॉन दोरीने लटकवले. पोलिसांनी शिवशंकरला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हे ही वाचा>> पुण्यात लेकरासमोर पत्नीला मारलं ठार, कात्रीच खुपसली अन् नंतर Video केला व्हायरल

पोलिसांनी आरोपीला केली अटक

घटनेचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, शिवशंकरची जेव्हा-जेव्हा चौकशी केली गेली तेव्हा त्याने प्रत्येक वेळी वेगवेगळी उत्तरे दिली. कडकपणे विचारणा केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याला त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp