50 हजाराची सुपारी अन् भाड्याचे गुंड, बायकोने फुलप्रुफ प्लान करून पतीचा काढला काटा
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याची (Husband) बायकोने (Wife) सुपारी देऊन त्याचा काटा काढला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) कसून तपास करत अवघ्या दोन दिवसात या घटनेचा उलगडा केला.
ADVERTISEMENT
देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. आता अशीत एक घटना समोर आली आहे. या घटनेत अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या नवऱ्याची (Husband) बायकोने (Wife) सुपारी देऊन त्याचा काटा काढला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) कसून तपास करत अवघ्या दोन दिवसात या घटनेचा उलगडा केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन सुपारी किलर यांना ताब्यात घेतले आहेत.तसेच या आरोपींकडून 7500 रोख, एक पिस्तुल, तीन जिवंत काड़तूसे, 5 मोबाईल आणि एक बाईक ताब्यात घेतली आहे. (wife killed husband with the help of supari killers over immoral relationship gopalganj bihar)
ADVERTISEMENT
फुलवरीया पोलिस (Police) ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेत मोहम्मद मिया यांची पत्नी नुरजहा खातून हिचे नौशाद आलम नावाच्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध (Immoral relationship) होते. मोहम्मद मिया अनेक वर्ष दुबईत राहायचा त्यामुळेच नुरजहाचे सूत नौशादसोबत जुळलं होतं. गेल्या साधारण 21 वर्षापासून नुरजहा खातून आणि नौशाद आलम अनैतिक संबंधात होते. या अनैतिक संबंधाची माहिती मोहम्मद मिया यांना लागली होती. त्यामुळे मोहम्मद नेहमी नुरजहाला मारहाण करायचा. या सततच्या मारहाणीला कंटाळून नुरजहा खातून हिने पतीच्या हत्येचा कट रचला होता.
हे ही वाचा : 134 करोडची संपत्ती, लग्नाच्या तासाभरात मृत्यू, तरूणासोबत काय घडलं?
असा काढला पतीचा काटा
नुरजहा खातूनने पतीचा काटा काढण्यासाठी हत्येची सुपारी दिली होती. यासाठी तिने दोन सुपारी किलरला 50 हजार रूपयांची रक्कम दिली होती. या रक्कमेतून एक पिस्तुल आणि 4 जीवंत काडतूसे विकत घेतली होती. हत्येसाठी गरजेच्या असलेल्या सर्व गोष्टी घेतल्यानंतर नुरजहा खातूनने सुपारी किलरना मोहम्मद मियाची हत्या करण्यासाठी मोबाईलवरून गाईड केले होते. नुरजहा खातून खिड़कीमधून आरोपींना मोबाईल फोनवरून सर्व निर्देश देत होते.यावेळी आरोपींनी घराबाहेर झोपलेल्या मोहम्मदची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती.
हे वाचलं का?
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला होता. तसेच खबऱ्यांमार्फत तपासाची चक्रे फिरवली होती. यावेळी तपासात नुरजहा खातूनचे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नुरजहा खातूनला पोलिसी खाक्या दाखवताच तिने संपूर्ण घटनेची उकल केली. नवरा माझ्यासोबत बायको सारखा वागायचा नाही.नेहमी मला मारहाण करायचास, त्यामुळेच त्याची हत्या केलीची कबुली तिने दिली.
या प्रकरणात पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे.यामध्ये दोघे सुपारी किलर आहेत, नुरजहा खातून आणि तिचा प्रियकर आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मुंबईत लव्ह जिहाद? भांडूपची मुलगी थेट आझमगडला, नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT